Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > Cotton Market: कापूस बाजारात तेजी; MSPपेक्षा जास्त दर मिळूनही शेतकरी नाराज

Cotton Market: कापूस बाजारात तेजी; MSPपेक्षा जास्त दर मिळूनही शेतकरी नाराज

latest news Cotton Market: Cotton market booms; Farmers unhappy despite getting higher prices than MSP | Cotton Market: कापूस बाजारात तेजी; MSPपेक्षा जास्त दर मिळूनही शेतकरी नाराज

Cotton Market: कापूस बाजारात तेजी; MSPपेक्षा जास्त दर मिळूनही शेतकरी नाराज

Cotton Market : कापूस बाजारात सध्या मोठा ट्विस्ट पाहायला मिळत असून दर MSPपेक्षा जास्त गेले आहेत. मात्र, बहुतांश शेतकऱ्यांकडे कापूस शिल्लक नसल्याने या वाढीव दरांचा फायदा व्यापाऱ्यांना होत असल्याचे चित्र समोर आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.(Cotton Market)

Cotton Market : कापूस बाजारात सध्या मोठा ट्विस्ट पाहायला मिळत असून दर MSPपेक्षा जास्त गेले आहेत. मात्र, बहुतांश शेतकऱ्यांकडे कापूस शिल्लक नसल्याने या वाढीव दरांचा फायदा व्यापाऱ्यांना होत असल्याचे चित्र समोर आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.(Cotton Market)

अकोला : राज्यातील कापूसबाजारात सध्या तेजीचे वातावरण निर्माण झाले असून दर ९ हजार रुपयांच्या उंबरठ्यावर पोहोचले आहेत. (Cotton Market)

अकोला जिल्ह्यातील अकोट बाजार समितीत कापसाला प्रति क्विंटल ८,९०० रुपयांपर्यंत दर मिळत असून बुधवारी (१ एप्रिल) रोजी ८,८४० रुपये दर नोंदवण्यात आला. (Cotton Market)

किमान आधारभूत किंमतीपेक्षा (MSP) जास्त दर मिळत असल्याने ही शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बाब मानली जात आहे.

अकोट बाजार समितीत दरात तेजी

अकोट बाजार समितीत सध्या कापसाला चांगला भाव मिळत आहे. बाजारातील आवक कमी आणि मागणी वाढल्यामुळे दरात सातत्याने वाढ होत आहे. व्यापाऱ्यांकडून कापसाची मागणी वाढल्याने बाजारात स्पर्धा निर्माण झाली आहे.

शेतकऱ्यांकडे कापूसच नाही!

दर वाढले असले तरी याचा फायदा नेमका कोणाला होणार, हा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. कारण बहुतांश शेतकऱ्यांनी आधीच कमी दरात कापूस विकून टाकला आहे.

सध्या शेतकऱ्यांकडे कापूस शिल्लक नसल्याने वाढलेल्या दरांचा लाभ व्यापारी किंवा साठेबाजांकडे जात असल्याचे चित्र आहे.

उत्पादनात घट, दरात वाढ

गतवर्षीच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी सोयाबीनसोबत कापूस लागवडीला प्राधान्य दिले होते. मात्र,

सुरुवातीला पावसाचा खंड

नंतर अतिवृष्टी

किडरोगांचा प्रादुर्भाव

या कारणांमुळे कापूस उत्पादनात मोठी घट झाली. परिणामी बाजारात कापसाची उपलब्धता कमी झाली आणि दर वाढले.

हमीभाव केंद्रांतील अडचणी

काही शेतकऱ्यांनी कापूस हमीभाव केंद्रावर विक्री करण्याचा प्रयत्न केला. मात्र,

जाचक अटी

ऑनलाइन नोंदणीतील तांत्रिक अडचणी

खरेदीतील विलंब

यामुळे अनेक शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे त्यांनी खासगी व्यापाऱ्यांकडे कमी दरात कापूस विकण्याचा पर्याय निवडला.

बाजारातील सध्याची स्थिती

सध्या बाजारात कापसाची आवक कमी आहे, तर मागणी कायम आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत दर आणखी वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

मात्र, शेतकऱ्यांकडे कापूस उपलब्ध नसल्याने या तेजीचा थेट फायदा त्यांना मिळणार की नाही, याबाबत शंका आहे.

कापसाच्या दरात झालेली वाढ ही सकारात्मक बाब असली तरी शेतकऱ्यांना त्याचा प्रत्यक्ष फायदा कमी प्रमाणात होताना दिसत आहे.

भविष्यात अशा परिस्थिती टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी साठवणूक, बाजाराचा अभ्यास आणि योग्य वेळेवर विक्री यावर भर देण्याची गरज तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

हे ही वाचा सविस्तर : Mango Farming Tips : अवकाळी पावसानंतर आंबा बाग वाचवायची? 'या' उपायांनी टळेल मोठं नुकसान!

अधिक वाचा : Electricity Bill Problems : वीजबिल अचानक वाढलं? स्मार्ट मीटर नव्हे; 'हे' आहे खरे कारण

Web Title : कपास बाजार में उछाल, ऊंचे दामों के बावजूद किसान नाखुश: रिपोर्ट

Web Summary : कपास की कीमतें बढ़ रही हैं, जो ₹9,000/क्विंटल के करीब हैं। MSP से अधिक होने के बावजूद, कई किसानों ने पहले ही कम दरों पर अपना स्टॉक बेच दिया, जिससे व्यापारियों को फायदा हुआ। विशेषज्ञ बेहतर भंडारण और बाजार विश्लेषण की सलाह देते हैं।

Web Title : Cotton Market Surges, Farmers Unhappy Despite High Prices: Report

Web Summary : Cotton prices are rising, nearing ₹9,000/quintal. Despite exceeding MSP, many farmers already sold their stock at lower rates due to prior crop losses and procurement issues, leaving traders to benefit. Experts advise better storage and market analysis.