Lokmat Agro >बाजारहाट > कापसाची आयात वाढली, निर्यात मंदावली, आठ महिन्यांत किती गाठींची आयात झाली?

कापसाची आयात वाढली, निर्यात मंदावली, आठ महिन्यांत किती गाठींची आयात झाली?

Latest News Cotton imports increased, exports slowed down, 27 lakh bales of cotton imported in eight months | कापसाची आयात वाढली, निर्यात मंदावली, आठ महिन्यांत किती गाठींची आयात झाली?

कापसाची आयात वाढली, निर्यात मंदावली, आठ महिन्यांत किती गाठींची आयात झाली?

Cotton Import : यातून हाेणारे आर्थिक नुकसान पाहता कापसाचे पेरणी क्षेत्र देशात ३.३५ टक्क्यांनी, तर राज्यात ६.१२ टक्क्यांनी घटले आहे. 

Cotton Import : यातून हाेणारे आर्थिक नुकसान पाहता कापसाचे पेरणी क्षेत्र देशात ३.३५ टक्क्यांनी, तर राज्यात ६.१२ टक्क्यांनी घटले आहे. 

शेअर :

Join us
Join usNext

- सुनील चरपे
नागपूर : मागील काही वर्षांपासून कापसाची उत्पादकता (Cotton Production) व उत्पादन घटत आहे. वाढता खर्च, बाजारात मिळणारा कमी दर व यातून हाेणारे आर्थिक नुकसान पाहता कापसाचे पेरणी क्षेत्र देशात ३.३५ टक्क्यांनी, तर राज्यात ६.१२ टक्क्यांनी घटले आहे. 

त्यातच चालू कापूस हंगामाच्या (Cotton Season) पहिल्या आठ महिन्यांत २७ लाख गाठी कापसाची उच्चांकी आयात करण्यात आली. कापसाची वाढती आयात व जागतिक पातळीवर दबावात असलेले दर विचारात घेता आगामी हंगामात कापसाचे दर ‘एमएसपी’च्या आसपास स्थिरावण्याची शक्यता बळावली आहे.

१ ऑक्टाेबर ते ३० सप्टेंबर हा काळ कापूस वर्ष मानले जाते. देशात कापसाचा वापर व मागणी स्थिर असल्याने १ ऑक्टाेबर ते ३१ मे या आठ महिन्यांच्या काळात कापसाची उच्चांकी आयात करण्यात आली. तुलनेत निर्यात मात्र १८ लाख गाठींवर मर्यादित राहिली. सन २०२४-२५ या खरीप हंगामासाठी केंद्र सरकारने लांब धाग्याच्या कापसाची एमएसपी ७,५२१ रुपये प्रतिक्विंटल जाहीर केली हाेती. वास्तवात बहुतांश शेतकऱ्यांना ६,८०० ते ७,२०० रुपयांदरम्यान कापूस विकावा लागला.

चालू हंगामासाठी कापसाची एमएसपी ८,११० रुपये जाहीर करण्यात आली आहे. सध्या मध्यम लांब धाग्याच्या रुईचे दर ५५,८०० ते ५६,५०० रुपये, तर लांब धाग्याच्या रुईचे दर ५६,६०० ते ५७,००० प्रतिखंडी असून, सरकीचे दर ३,६०० ते ४,५४० रुपये प्रतिक्विंटल दरम्यान असल्याने कापसाला सरासरी ७,३०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. हेच दर आगामी तीन महिन्यांपर्यंत कायम राहण्याची शक्यता असून, सरकीचे दर कमी झाल्यास कापसाला प्रतिक्विंटल ७,२०० तर वाढल्यास ७,५०० रुपयांच्या आसपास दर मिळू शकताे.
----

 कापसाची आयात व निर्यात (लाख गाठी) 
हंगामआयातनिर्यात
२०१९-२०१५.५० लाख गाठी ४६.०४ लाख गाठी
२०२०-२१११.०३ लाख गाठी७७.५९ लाख गाठी
२०२१-२२२१.०० लाख गाठी४३.०० लाख गाठी
२०२२-२३१४.०० लाख गाठी३०.०० लाख गाठी
२०२३-२४२२.०० लाख गाठी२८.३६ लाख गाठी
२०२४-२५ २७.०० लाख गाठी१८.०० लाख गाठी

 

कापसाचे सरासरी दर             एमएसपी (रुपये/प्रतिक्विंटल) 
वर्ष दरएमएसपी
२०१९-२०५ हजार ३८७५ हजार ५५०
२०२०-२१५ हजार ४३०५ हजार ८२५
२०२१-२२८ हजार ९५८६ हजार २५
२०२२-२३७ हजार ७७६६ हजार ३८०
२०२३-२४७ हजार ३५० ७ हजार २०
२०२४-२५ ७ हजार २५२ ७ हजार ५२१
देशकापसाची आयात
ब्राझील७.५० लाख गाठी
अमेरिका५.२५ लाख गाठी
ऑस्ट्रेलिया५.०० लाख गाठी
माली१.७९ लाख गाठी
इजिप्त ८३ हजार गाठी

 

Web Title: Latest News Cotton imports increased, exports slowed down, 27 lakh bales of cotton imported in eight months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.