Lokmat Agro >बाजारहाट > Chillies Market : हिरव्या मिरचीने भरली शेतकऱ्यांच्या खिशात गोडी वाचा सविस्तर

Chillies Market : हिरव्या मिरचीने भरली शेतकऱ्यांच्या खिशात गोडी वाचा सविस्तर

latest news Chillies Market : Green chillies fill farmers' pockets with sweetness Read in detail | Chillies Market : हिरव्या मिरचीने भरली शेतकऱ्यांच्या खिशात गोडी वाचा सविस्तर

Chillies Market : हिरव्या मिरचीने भरली शेतकऱ्यांच्या खिशात गोडी वाचा सविस्तर

Chillies Market : यंदा हिरवी मिरची शेतकऱ्यांना चांगलीच साथ देत आहे. उत्पादन अपेक्षेपेक्षा जास्त, आणि बाजारात दरही भरघोस मिळत आहे. ७० रुपयांपर्यंत पोचलेल्या दरामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाला गोडी आली असून बाजारपेठेत समाधानाचं वातावरण आहे. (Chillies Market)

Chillies Market : यंदा हिरवी मिरची शेतकऱ्यांना चांगलीच साथ देत आहे. उत्पादन अपेक्षेपेक्षा जास्त, आणि बाजारात दरही भरघोस मिळत आहे. ७० रुपयांपर्यंत पोचलेल्या दरामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाला गोडी आली असून बाजारपेठेत समाधानाचं वातावरण आहे. (Chillies Market)

शेअर :

Join us
Join usNext

Chillies Market :  भोकरदन तालुक्यात यंदा हिरवी मिरची शेतकऱ्यांना चांगलीच साथ देत आहे. उत्पादन अपेक्षेपेक्षा जास्त, आणि बाजारात दरही भरघोस मिळत आहे.(Chillies Market)

७० रुपयांपर्यंत पोचलेल्या दरामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाला गोडी आली असून बाजारपेठेत समाधानाचं वातावरण आहे. मात्र, पुढच्या महिन्यात आवक वाढल्यास भाव पडण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.(Chillies Market)

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा हिरव्या मिरचीचे उत्पादन अधिक असून भावही समाधानकारक मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आहे. (Chillies Market)

वडोद तांगडा, धावडा, वाढोणा, विझोरा, मेहगाव, भोरखेड़ा आदी गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर उन्हाळी मिरचीची लागवड झाली होती. (Chillies Market)

आता ही मिरची तोडणीला आली असून प्रतिकिलो काळी मिरचीला ७० रुपये आणि ज्वेलरी जातीला ६५ रुपये इतका दर मिळतो आहे.(Chillies Market)

यंदा हिरव्या मिरचीचे उत्पादन जास्त झाले असूनही चांगला दर मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, पुढील आठवड्यांत आवक वाढल्यास भाव कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी मिरचीची विक्री योग्य नियोजनाने करावी, असा सल्ला व्यापाऱ्यांनी दिला आहे.(Chillies Market)

चांगल्या उत्पादनासह चांगला दर

भोकरदन तालुक्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे मिरचीच्या काही शेतांत रोगराई वाढली होती. त्यावर शेतकऱ्यांना औषध फवारणी करावी लागली. मात्र, गेल्या आठ दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्यामुळे शेतकऱ्यांनी पुन्हा मशागतीची कामे हाती घेतली आणि मिरचीची तोडणीही वेगाने सुरू केली.

सध्या बाजारपेठेत मिरचीची आवक कमी असल्यामुळे दर चांगले मिळत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण आहे. मात्र, पुढच्या महिन्यात आवक वाढल्यास दरात घट होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तविली आहे.

यंदाचे उत्पादन आणि खर्च

मी चार एकरांत विविध जातीची मिरची लावली आहे. आतापर्यंत तीन वेळा तोडणी झाली असून लागवडीनंतर आजवर सुमारे चार लाखांचा खर्च आला. मात्र यंदा दर चांगले असल्यामुळे आर्थिक नुकसान टळले आहे.- माणिक तांगडे, शेतकरी 

सध्या बाजारात आवक कमी आहे म्हणून भाव चांगले मिळत आहेत. पण पुढील आठवड्यात आवक वाढेल, तेव्हा दरात घट होईल.- समाधान गावंडे, ठोक व्यापारी, विझोरा

जातीप्रमाणे मिरचीचे यंदाचे दर (प्रतिकिलो)

मिरचीची जातमागील वर्षीचा दर (₹)यंदाचा दर (₹)
काळी४५–५०७०
ज्वेलरी४५–६५६५
शिमला३५–४०४०
पिकेडोर३९–४०४५–६५
बळिराम४५–५०५०

हे ही वाचा सविस्तर : Chilli Export : सिल्लोडची मिरची 'हॉट'; दुबईसह देशभरातून मागणी, दर झपाट्याने वाढले वाचा सविस्तर

Web Title: latest news Chillies Market : Green chillies fill farmers' pockets with sweetness Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.