Lokmat Agro >बाजारहाट > Chia Seed Market : मागणी वाढली, आवक कमी; चियाला मिळाला विक्रमी भाव वाचा सविस्तर

Chia Seed Market : मागणी वाढली, आवक कमी; चियाला मिळाला विक्रमी भाव वाचा सविस्तर

latest news Chia Seed Market: Demand increased, arrivals decreased; Chia received a record price | Chia Seed Market : मागणी वाढली, आवक कमी; चियाला मिळाला विक्रमी भाव वाचा सविस्तर

Chia Seed Market : मागणी वाढली, आवक कमी; चियाला मिळाला विक्रमी भाव वाचा सविस्तर

Chia Seed Market : वाशिम जिल्ह्यात चिया उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. अवघ्या सहा दिवसांत चियाच्या दरात तब्बल दीड हजार रुपयांची उसळी झाली असून, बाजारात भाव २२ हजार २५० रुपये प्रती क्विंटलवर पोहोचले आहेत. मागणी वाढली, आवक कमी यामुळे चियाच्या भावात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Chia Seed Market)

Chia Seed Market : वाशिम जिल्ह्यात चिया उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. अवघ्या सहा दिवसांत चियाच्या दरात तब्बल दीड हजार रुपयांची उसळी झाली असून, बाजारात भाव २२ हजार २५० रुपये प्रती क्विंटलवर पोहोचले आहेत. मागणी वाढली, आवक कमी यामुळे चियाच्या भावात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Chia Seed Market)

शेअर :

Join us
Join usNext

Chia Seed Market : वाशिम जिल्ह्यातील चिया उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत चियाच्या दरात गेल्या आठवड्यापासून जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे.  (Chia Seed Market)

अवघ्या सहा दिवसांत चियाचे भाव प्रतिक्विंटल दीड हजार रुपयांनी वाढून २२ हजार २५० रुपयांवर पोहोचले आहेत. (Chia Seed Market)

भाववाढीचा आकडा

९ सप्टेंबर : कमाल दर २० हजार ७०१ रुपये प्रति क्विंटल

१५ सप्टेंबर : कमाल दर २२,२५० रुपये प्रति क्विंटल

सहा दिवसांत तब्बल १ हजार ५४९ रुपयांची उसळी

गतवर्षी याच बाजार समितीत चियाचे भाव विक्रमी २५ हजार प्रति क्विंटल पर्यंत पोहोचले होते. त्यानंतर दरांमध्ये काही काळ चढ-उतार झाला, जून-जुलैमध्ये तर भाव १७ हजार रुपये क्विंटलपर्यंत घसरले होते. मात्र, सप्टेंबरच्या सुरुवातीपासून पुन्हा दरवाढ सुरू झाली.

आवक कमी, मागणी जास्त

सोमवारी बाजारात चियाची आवक केवळ २०० क्विंटल इतकीच झाली. त्याआधी मंगळवारी आवक २८० क्विंटल होती. भाववाढ असूनही आवक कमी झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

दरात सातत्याने सुधारणा होत आहे. पुरवठा घटला असून राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय बाजारात चियाची मागणी वाढत आहे. त्यामुळे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.

वाढत्या मागणीचा परिणाम

राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर चियाला मागणी वाढत आहे. सध्या हंगाम अंतिम टप्प्यात असल्याने पुरवठा कमी, तर मागणी वाढली आहे. त्यामुळे दरात वाढ होऊन शेतकऱ्यांना चांगला फायदा मिळत आहे.

पुढील अंदाज

तज्ज्ञांच्या मते, जर मागणीचा हा कल कायम राहिला तर येत्या काही दिवसांत चियाचे भाव आणखी वाढू शकतात. यामुळे पुढील हंगामात जिल्ह्यात चियाचे क्षेत्र वाढण्याची दाट शक्यता आहे.

चियाच्या दरवाढीमुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद खुलला आहे. पुरवठा कमी आणि मागणी जास्त – यामुळे चिया पिकाला चांगला बाजारभाव मिळत आहे. योग्य नियोजन करून शेतकरी या पिकातून अधिक नफा कमावू शकतात.

चिया उत्पादकांसाठी सल्ला

बाजारातील दर आणि आवक यावर सतत लक्ष ठेवा

गुणवत्तापूर्ण उत्पादनासाठी योग्य तंत्रज्ञान वापरा

राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय मागणीचा अंदाज घेऊन पेरणी नियोजन करा

हे ही वाचा सविस्तर : Chia Seed Market : वाशिम बाजारात चिया भावात उसळी; प्रती क्विंटल असा मिळाला दर वाचा सविस्तर

Web Title: latest news Chia Seed Market: Demand increased, arrivals decreased; Chia received a record price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.