Lokmat Agro >बाजारहाट > Chia Seed Market : वाशिम बाजारात चिया भावात उसळी; प्रती क्विंटल असा मिळाला दर वाचा सविस्तर

Chia Seed Market : वाशिम बाजारात चिया भावात उसळी; प्रती क्विंटल असा मिळाला दर वाचा सविस्तर

latest news Chia Seed Market: Chia prices surge in Washim market; Price per quintal is as follows, read in detail | Chia Seed Market : वाशिम बाजारात चिया भावात उसळी; प्रती क्विंटल असा मिळाला दर वाचा सविस्तर

Chia Seed Market : वाशिम बाजारात चिया भावात उसळी; प्रती क्विंटल असा मिळाला दर वाचा सविस्तर

Chia Seed Market : घसरलेल्या दरामुळे चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना चिया बाजारातून मोठा दिलासा मिळाला आहे. वाशिममध्ये मंगळवारी चियाचे दर पुन्हा २० हजारांच्या पुढे गेल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.(Chia Seed Market)

शेअर :

Join us
Join usNext

Chia Seed Market : घसरलेल्या दरामुळे चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना चिया बाजारातून मोठा दिलासा मिळाला आहे. वाशिममध्ये मंगळवारी चियाचे दर पुन्हा २० हजारांच्या पुढे गेल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.(Chia Seed Market)

वाशिम जिल्ह्यातील नाविन्यपूर्ण पिकांपैकी एक असलेल्या चियाच्या दरात पुन्हा एकदा सुधारणा झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मागील काही दिवसांपासून बाजारात चियाचे दर घसरून ते १८ हजार रुपयांच्या खाली आले होते. मात्र, मंगळवारी वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत दरात लक्षणीय वाढ झाली.(Chia Seed Market)

मंगळवारी (९ सप्टेंबर) रोजी बाजारात एकूण २८० क्विंटल चियाची आवक झाली होती. चियाला किमान १७ हजार ६०० रुपये तर कमाल तब्बल २० हजार ७०१ रुपये प्रती क्विंटल असा दर मिळाला. (Chia Seed Market)

दरवाढीमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून, आगामी हंगामात जिल्ह्यात चियाचे उत्पादनक्षेत्र आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.(Chia Seed Market)

शेतकऱ्यांसाठी दिलासादायक चित्र

चियाच्या दरात सुधारणा होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. यापूर्वी दर घसरल्याने शेतकरी चिंतेत होते. परंतु आता वाढलेले दर पाहता चिया पिकाबाबतचा आत्मविश्वास पुन्हा वाढला आहे.

चिया पिकाचे महत्त्व

आरोग्यासाठी उपयुक्त मानल्या जाणाऱ्या चिया बियांना राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी आहे. कमी क्षेत्रात जास्त उत्पन्न देणारे हे पीक असल्याने शेतकरी चियाला पर्यायी आणि फायदेशीर पीक म्हणून पाहत आहेत.

पुढील हंगामात क्षेत्रवाढीची शक्यता

दरवाढीमुळे शेतकऱ्यांचा चियाकडे कल वाढणार असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. जिल्ह्यात मागील काही वर्षांत चियाची लागवड हळूहळू वाढली असून, २० हजारांच्या आसपास स्थिरावलेले दर शेतकऱ्यांना नवा दिलासा देणारे ठरणार आहेत.

हे ही वाचा सविस्तर : Hingoli Market Yard : हिंगोली बजारात उद्या शेतमाल व्यवहार बंद; काय आहे कारण वाचा सविस्तर

Web Title: latest news Chia Seed Market: Chia prices surge in Washim market; Price per quintal is as follows, read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.