रिसोड : पर्यायी आणि नाविन्यपूर्ण पीक म्हणून ओळख मिळवत असलेल्या चियाच्या खरेदीस रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीत अधिकृत सुरुवात झाली आहे. (Chia Seed Market)
बुधवारी (२५ फेब्रुवारी) चिया विक्रीचा शुभारंभ करण्यात आला. (Chia Seed Market)
पहिल्याच दिवशी तब्बल १५० क्विंटल चियाची आवक झाली असून चियाला प्रतिक्विंटल १६ हजार २५० रुपयांपर्यंत उच्चांकी दर मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.(Chia Seed Market)
रिसोड व परिसरातील शेतकरी पर्यायी पीक म्हणून चियाकडे मोठ्या प्रमाणावर वळताना दिसत आहेत.
या पिकाची लागवड वाढावी यासाठी बाजार समितीने पुढाकार घेत शेतकऱ्यांना अल्प दरात चिया बियाणे उपलब्ध करून दिले होते.
या उपक्रमाचा सकारात्मक परिणाम दिसून आला असून वाशिम जिल्ह्यात सर्वाधिक चियाचा पेरा रिसोड तालुक्यात झाल्याचे सांगितले जाते.
चिया उत्पादक शेतकऱ्यांना विक्रीची स्थिर आणि खात्रीशीर बाजारपेठ मिळावी, यासाठी समितीकडून गेल्या वर्षापासून खरेदी-विक्री प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
यंदा चियाचे उत्पादन चांगले होण्याची शक्यता असल्याने नियमित बाजारपेठ उपलब्ध करून देण्यावर समितीचा भर आहे.
रिसोड कृषी उत्पन्न बाजार समिती हळद खरेदी-विक्रीसाठी देशभरात ओळखली जाते. हळदीची मोठी आवक सुरू होईपर्यंत दर बुधवारी चिया विक्रीचे नियोजन करण्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्यांना ठराविक दिवशी आपला माल विक्रीस आणणे सोपे होणार आहे.
या शुभारंभ प्रसंगी समितीचे पदाधिकारी, कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने चिया उत्पादक शेतकरी उपस्थित होते. विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांचा सत्कारही करण्यात आला.
चियाला मिळालेल्या चांगल्या दरामुळे आणि उपलब्ध बाजारपेठेमुळे येत्या काळात या पिकाखालील क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Web Summary : Risod APMC sees a strong start to chia seed sales, with prices reaching ₹16,250/quintal. Farmers are shifting to chia as an alternative crop, supported by the market committee's initiative to provide affordable seeds. The committee aims to provide a stable market for chia growers, planning weekly sales.
Web Summary : रिसोड कृषि उत्पन्न बाजार समिति में चिया बीज की बिक्री की मजबूत शुरुआत हुई, कीमतें ₹16,250/क्विंटल तक पहुंचीं। किसान चिया को वैकल्पिक फसल के रूप में अपना रहे हैं, बाजार समिति द्वारा किफायती बीज उपलब्ध कराने की पहल का समर्थन किया जा रहा है। समिति का लक्ष्य चिया उत्पादकों के लिए एक स्थिर बाजार प्रदान करना है, साप्ताहिक बिक्री की योजना है।