Lokmat Agro >बाजारहाट > Chia Market : चियाच्या बाजारात उलथापालथ; विक्रमानंतर दरात मोठी घसरण वाचा सविस्तर

Chia Market : चियाच्या बाजारात उलथापालथ; विक्रमानंतर दरात मोठी घसरण वाचा सविस्तर

latest news Chia Market: Upheaval in the chia market; Big drop in prices after record highs Read in detail | Chia Market : चियाच्या बाजारात उलथापालथ; विक्रमानंतर दरात मोठी घसरण वाचा सविस्तर

Chia Market : चियाच्या बाजारात उलथापालथ; विक्रमानंतर दरात मोठी घसरण वाचा सविस्तर

Chia Market :मागील आठवड्यात विक्रमी पातळी गाठलेल्या चियाच्या दरात अवघ्या आठवड्याभरात तब्बल ४ हजार ६०० रुपयांची घसरण झाली आहे. वाशिम बाजारात चियाला जास्तीत जास्त १९ हजार ९०० रुपयांचा दर मिळाला.(Chia Market)

Chia Market :मागील आठवड्यात विक्रमी पातळी गाठलेल्या चियाच्या दरात अवघ्या आठवड्याभरात तब्बल ४ हजार ६०० रुपयांची घसरण झाली आहे. वाशिम बाजारात चियाला जास्तीत जास्त १९ हजार ९०० रुपयांचा दर मिळाला.(Chia Market)

शेअर :

Join us
Join usNext

Chia Market : मागील आठवड्यात विक्रमी पातळी गाठलेल्या चियाच्या दरात अवघ्या आठवड्याभरात तब्बल ४ हजार ६०० रुपयांची घसरण झाली आहे. वाशिम बाजारात चियाला जास्तीत जास्त १९ हजार ९०० रुपयांचा दर मिळाला. (Chia Market)

अचानक वाढलेली आवक आणि कमी झालेली मागणी यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आणि नैराश्याचे वातावरण पसरले आहे.(Chia Market)

नावीन्यपूर्ण पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चियाच्या दरात आठवडाभरात मोठी घसरण झाली असून, शेतकऱ्यांमध्ये निराशा आणि संभ्रम निर्माण झाला आहे.(Chia Market)

गत आठवड्यात वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत चियाने विक्रमी २४ हजार ५०१ रुपये प्रति क्विंटलचा उच्चांकी दर गाठला होता. परंतु, शनिवार, १९ जुलै रोजी चियाला फक्त १९ हजार ९०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला.(Chia Market)

दरवाढीनंतर विक्रीचा मारा, आवक दुपटीहून अधिक

१२ जुलै रोजी वाशिम बाजारात चियाच्या आवक ६५० क्विंटल होती आणि त्याला कमाल २३ हजार ५०१ रुपये दर मिळाला. या दरवाढीनंतर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर चियाची विक्री सुरू केली. परिणामी, १९ जुलै रोजी आवक थेट दुपटीहून अधिक होऊन १ हजार ३५० क्विंटलपर्यंत पोहोचली.

आवक वाढल्यामुळे चियाच्या दरात सातत्याने घसरण होऊन तो १२ हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत खाली आला, मात्र मागील आठवड्यात राष्ट्रीय स्तरावर मागणी वाढल्याने दर पुन्हा काही प्रमाणात उसळून विक्रमी पातळीवर गेले होते.

लागवडीचे क्षेत्र वाढले, उत्पादन चांगले

२०२२-२३ मध्ये जिल्ह्यात १६२ हेक्टर क्षेत्रावर चियाची लागवड झाली होती. यशस्वी प्रयोगानंतर २०२४-२५ मध्ये चियाचे लागवडीचे क्षेत्र तब्बल ३ हजार ६०८ हेक्टरपर्यंत वाढले. चांगले उत्पादन आणि मागणीमुळे शेतकऱ्यांना सुरुवातीला चांगला दर मिळाला. मात्र, अचानक आवक वाढल्यामुळे बाजारात उलथापालथ निर्माण झाली आहे.

शेतकऱ्यांमध्ये संभ्रम

दरात मोठी घसरण झाल्यामुळे चिया उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे आणि नैराश्याचे वातावरण आहे. मागणी स्थिर राहिल्यास दर पुन्हा सुधारेल, अशी अपेक्षा व्यापाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

असे मिळाले दर 

१२ जुलै (शुक्रवार) 

किमान दर : १७ हजार ५०० रु./क्विंटल

कमाल दर : २३ हजार ५०१ रु./क्विंटल

आवक : ६५० क्विंटल

१९ जुलै (शनिवार) 

कमाल दर : १९ हजार ९०० रु./क्विंटल

आवक : १,३५० क्विंटल

हे ही वाचा सविस्तर : Chia Market : चियाच्या दरात विक्रमी झेप; शेतकऱ्यांना मिळतोय हमखास नफा वाचा सविस्तर

Web Title: latest news Chia Market: Upheaval in the chia market; Big drop in prices after record highs Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.