Join us

Chia Market : चियाच्या दरात विक्रमी झेप; शेतकऱ्यांना मिळतोय हमखास नफा वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2025 13:40 IST

Chia Market : शेतीत नावीन्याचा मार्ग स्विकारणाऱ्या वाशिमच्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. कमी खर्चात, कमी वेळात आणि अधिक मोबदला देणारे चिया हे पीक शेतकऱ्यांना मालामाल करत आहे.(Chia Market)

Chia Market : शेतीत नावीन्याचा मार्ग स्विकारणाऱ्या वाशिमच्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. कमी खर्चात, कमी वेळात आणि अधिक मोबदला देणारे चिया हे पीक शेतकऱ्यांना मालामाल करत आहे. (Chia Market)

मागील महिन्यात १२-१३ हजाराला मिळणाऱ्या चियाने अवघ्या आठवड्यात विक्रमी उडी मारत प्रतिक्विंटल २४ हजार ५०१ रुपयांपर्यंतचा उच्चांक गाठला आहे. दरवाढ आणि मागणी यामुळे बाजारपेठेत चियाला मोठी चमक आली असून शेतकरीही समाधानी आहेत.(Chia Market)

नावीन्यपूर्ण पीक असलेल्या चियाचे दर आता विक्रमी टप्पा ओलांडत आहेत. मागील महिन्यात १२ ते १३ हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत असलेले चियाचे दर आता थेट २४ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटलच्यावर पोहोचले आहेत. (Chia Market)

वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी चियाला किमान १७ हजार ५०० रुपये, ते कमाल-२४ हजार ५०१ रुपये प्रतिक्विंटलपर्यंतचे दर मिळाले. यामुळे चिया उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.(Chia Market)

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नावीन्यपूर्ण पिकांकडे वळवून त्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि कृषी विभाग विशेष प्रयत्न करीत आहे. याचीच फलश्रुती म्हणून लागवड झाली आणि शेतकऱ्यांना चांगले उत्पादनही झाले. (Chia Market)

पारंपरिक पिकांच्या तुलनेत 'चिया' हे अल्पखर्चिक आणि अधिक उत्पादन देणारे पीक शेतकऱ्यांना मालामाल करत आहे.

७२५१ रुपयांची क्विंटलमागे आठवडाभरात वाढ

जिल्ह्यात मागील हंगामात तब्बल ३ हजार ६०८ हेक्टर क्षेत्रांवर चियाची लागवड झाली. जिल्ह्यात २०२२-२३ मध्ये नावीन्यपूर्ण असलेल्या चियाची १६२ हेक्टर क्षेत्रांवर लागवड करण्यात आली होती.

शेतकऱ्यांचा प्रयत्न पूर्णतः यशस्वी झाल्याने इतर शेतकऱ्यांनीही हे पीक स्वीकारले. त्यामुळेच २०२४-२५ मध्ये तब्बल ३ हजार ६०८ हेक्टरवर चियाची ६५० क्विंटलपेक्षा अधिक चियाची आवक या ठिकाणी झाली.

आठवडाभरात चियाच्या दरात

क्विंटलमागे ७ हजार २५१ रुपयांची वाढ झाली आहे. ५ जुलै रोजी चियाला कमाल १६ हजार २५० रुपये प्रती क्विंटल, तर १२ जुलै रोजी कमाल २३ हजार ५०१ रुपये प्रती क्विंटलपर्यंतचा दर मिळाला.

शेतकऱ्यांना दिलासा देणारे पीक

कमी कालावधीत तयार होणारे, हवामान बदलास तोंड देणारे आणि बाजारात चांगला दर मिळणारे पीक म्हणून चियाकडे पाहिले जात आहे. निर्यातक्षमता व औषधी गुणधर्मामुळे देशांतर्गत व जागतिक बाजारातही या पिकाला चांगली मागणी आहे.

दरामुळे आवकही वाढली

मागील काही दिवसांपासून चियाच्या दरात वाढ होत असल्याने शेतकरी या शेतमालाच्या विक्रीवर भर देऊ लागले आहेत. त्यामुळे बाजारात चियाची आवक वाढत आहे. मागील आठवड्यात वाशिम बाजार समितीत ४५० क्विंटल चियाची आवक झाली होती.

चियाचे दरवाढ

तारीखकिमान दर (रु./क्विंटल)कमाल दर (रु./क्विंटल)आवक (क्विंटल)
५ जुलै २०२५१२,५००१६,२५०४५०
१२ जुलै २०२५१७,५००२४,५०१६५०

हे ही वाचा सविस्तर : Chia Market: चियाच्या दरात क्विंटलमागे 'इतक्या' रुपयांची उसळी! जाणून घ्या सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीबाजारमार्केट यार्डमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीवाशिम