Join us
Daily Top 2Weekly Top 5

Chia Market :शेतकरी झाले मालामाल! ‘या’ पिकाला मिळाला विक्रमी भाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 17:18 IST

Chia Market : पर्यायी पिक म्हणून घेतलेल्या चियाने शेतकऱ्यांना अक्षरशः मालामाल करून टाकले आहे. रिसोड बाजारात या पिकाला तब्बल १८ हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. कमी खर्च, कमी जोखीम आणि जास्त नफा देणाऱ्या या पिकाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. नेमकं चिया पिकात एवढं खास काय आहे वाचा सविस्तर (Chia Market)

Chia Market : स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत चिया पिकाला मिळालेल्या विक्रमी दरामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

२२ एप्रिल रोजी चियाला तब्बल १८,००० रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाल्याने या नावीन्यपूर्ण पिकाकडे शेतकऱ्यांचा कल वेगाने वाढताना दिसत आहे. त्या दिवशी सुमारे ३०० क्विंटल चियाची आवक नोंदवण्यात आली.

पर्यायी पिकाकडे वाढता ओढा

तालुक्यात यंदा प्रथमच मोठ्या प्रमाणावर चियाची लागवड करण्यात आली होती. कमी उत्पादन खर्च, चांगला बाजारभाव आणि कमी जोखीम यामुळे हे पीक शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे. त्यामुळे रब्बी हंगामात पारंपरिक पिकांऐवजी अनेक शेतकरी चियाकडे वळत असल्याचे दिसून येत आहे.

वन्य प्राण्यांचा त्रास नाही

चिया पिकाला वन्य प्राण्यांकडून फारसे नुकसान होत नसल्याने शेतकऱ्यांचा विश्वास या पिकावर वाढला आहे. यामुळे संरक्षणाचा खर्चही कमी होतो आणि उत्पादन टिकून राहते.

बियाण्यांवरील सवलतीचा फायदा

यंदा बाजार समितीने चिया बियाणे ५० टक्के सवलतीत उपलब्ध करून दिल्याने अनेक शेतकऱ्यांनी प्रयोग म्हणून लागवड केली. त्याचे सकारात्मक परिणाम आता बाजारभावातून दिसून येत आहेत.

विक्रमी दरामुळे उत्साह

चियाला मिळालेल्या विक्रमी दरामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.

कमी खर्च, कमी जोखीम, उच्च बाजारभाव या त्रिसूत्रीमुळे चिया पीक पर्यायी शेतीसाठी अत्यंत फायदेशीर ठरत असल्याचे मत व्यक्त होत आहे. 

सध्याचा दर पाहता आगामी हंगामात लागवड क्षेत्र आणखी वाढण्याची शक्यता आहे.

बाजार समितीचा पुढाकार

शेतकऱ्यांच्या चिया पिकाला योग्य दर मिळावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. या नावीन्यपूर्ण पिकाला प्रोत्साहन देण्यासाठी बाजार समिती सातत्याने पुढाकार घेणार आहे. - विष्णुपंत भुतेकर,सभापती, रिसोड कृषी उत्पन्न बाजार समिती

चिया पिकाला मिळालेल्या उच्च दरामुळे शेतकऱ्यांसाठी हे पीक गेमचेंजर ठरत असून, भविष्यात या पिकाच्या क्षेत्रात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा सविस्तर : Chia Seed Market : चिया ठरतोय फायदेशीर; घसरणीनंतर दराची जोरदार कमबॅक!

अधिक वाचा : Halad Market : हळद बाजारात तेजीची चाहूल;'या' महिन्यांत दर वाढणार?

English
हिंदी सारांश
Web Title : Chia Market Boom: Farmers Prosper with Record Prices for Crop

Web Summary : Farmers are excited as chia seeds fetch record prices at the local market, reaching ₹18,000 per quintal. Low costs, minimal risk, and high returns are driving farmers to embrace chia cultivation, with increased planting expected next season.
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीबाजारमार्केट यार्डमार्केट यार्ड