Lokmat Agro >बाजारहाट > Chana Market : हरभऱ्याच्या दरात उसळी; साठा जपलेल्या शेतकऱ्यांना चांगला भाव वाचा सविस्तर

Chana Market : हरभऱ्याच्या दरात उसळी; साठा जपलेल्या शेतकऱ्यांना चांगला भाव वाचा सविस्तर

latest news Chana Market: Chana prices surge; Farmers who have kept their stocks get good prices Read in detail | Chana Market : हरभऱ्याच्या दरात उसळी; साठा जपलेल्या शेतकऱ्यांना चांगला भाव वाचा सविस्तर

Chana Market : हरभऱ्याच्या दरात उसळी; साठा जपलेल्या शेतकऱ्यांना चांगला भाव वाचा सविस्तर

Chana Market : सणासुदीच्या तोंडावर हरभरा डाळीच्या दरात चांगलीच उसळी पाहायला मिळत आहे. मागणीच्या तुलनेत आवक कमी असल्यामुळे दरात वाढ झाली आहे. परिणामी, साठा जपून ठेवलेल्या शेतकऱ्यांना क्विंटलमागे ६ हजार रुपयांपर्यंत दर मिळत असून, यामुळे त्यांच्यात समाधानाचं वातावरण आहे. (Chana Market)

Chana Market : सणासुदीच्या तोंडावर हरभरा डाळीच्या दरात चांगलीच उसळी पाहायला मिळत आहे. मागणीच्या तुलनेत आवक कमी असल्यामुळे दरात वाढ झाली आहे. परिणामी, साठा जपून ठेवलेल्या शेतकऱ्यांना क्विंटलमागे ६ हजार रुपयांपर्यंत दर मिळत असून, यामुळे त्यांच्यात समाधानाचं वातावरण आहे. (Chana Market)

शेअर :

Join us
Join usNext

Chana Market : सणासुदीच्या तोंडावर हरभरा डाळीच्या दरात चांगलीच उसळी पाहायला मिळत आहे. मागणीच्या तुलनेत आवक कमी असल्यामुळे दरात वाढ झाली आहे. (Chana Market)

परिणामी, साठा जपून ठेवलेल्या शेतकऱ्यांना क्विंटलमागे ६ हजार रुपयांपर्यंत दर मिळत असून, यामुळे त्यांच्यात समाधानाचं वातावरण आहे. (Chana Market)

बिहार, दिल्लीसह परराज्यांतूनही मागणी वाढल्याने येत्या काळात दर अजून वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.(Chana Market)

सणासुदीचा हंगाम जवळ येताच हरभरा डाळीच्या दरात चांगलीच उसळी पाहायला मिळत आहे. मागील काही आठवड्यांपासून किलोमागे ४ ते ५ रुपये दरवाढ झाली असून, व्यापाऱ्यांनी अजून दर वाढीचा अंदाज वर्तविला आहे. परिणामी, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव दिसू लागले आहेत.(Chana Market)

साठा जपणाऱ्या शेतकऱ्यांना चांगला दर

नांदेडसह मराठवाड्यात यंदा हरभऱ्याचे उत्पादन काही प्रमाणात घटले होते. हंगामात शेतकऱ्यांना क्विंटलमागे ५ हजार ते ५ हजार ५०० रुपये दर मिळाला होता. परंतु काही शेतकऱ्यांनी आपला साठा बाजारात न आणता जपून ठेवला.

आता मागणी वाढल्यामुळे दर क्विंटलमागे ६ हजाररुपयांपर्यंत पोहोचत आहेत. त्यामुळे जपून ठेवलेल्या हरभऱ्याला चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

मागणीच्या तुलनेत आवक कमी

बिहार, दिल्ली आणि पश्चिम बंगालमधून मोठ्या प्रमाणात हरभऱ्याला मागणी वाढली आहे. त्याचबरोबर सणासुदीच्या दिवसांत पुरणपोळीसारख्या पारंपरिक पदार्थांसाठी चना डाळीला अधिक मागणी असते. 

मात्र, सध्या आवक मंदावली आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना होत असून, साठा असलेल्या शेतकऱ्यांना दरवाढीचा लाभ होतो आहे.

दर आणखी वाढतील

व्यापाऱ्यांच्या मते, आवक कमी आणि मागणी जास्त असल्यामुळे दर अजून काही आठवडे चढे राहण्याची शक्यता आहे. 

येणाऱ्या दिवाळीपर्यंत दर आणखी ३ ते ५ रुपये किलोने वाढतील, असा अंदाज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शिल्लक साठ्याचा योग्य वेळ साधून विक्री केल्यास अधिक फायदा होऊ शकतो.

सध्या बाजारातील डाळींचे दर (प्रति किलो)

डाळसध्याचा दर
हरभरा८०–८५
तूर११०
मसूर९०
मूग१२०
उडीद१२०

मागणी पाहूनच विक्री करा

गेल्या वर्षी बाजारात मोठ्या प्रमाणात आवक झाल्यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळाले नाहीत. मात्र यंदा परिस्थिती उलट आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हंगामी साठा बाजारात टाकताना मागणीचा अंदाज घेऊन आणि व्यापाऱ्यांच्या दरांचा मागोवा घेऊनच विक्री करावी, असा सल्ला बाजारतज्ज्ञांनी दिला आहे.

शेतकऱ्यांच्या खिशात आनंद

ज्या दरवाढीमुळे गृहिणींचे बजेट कोलमडले, त्याच दरवाढीने शेतकऱ्यांच्या खिशात आनंद दिला आहे. सणासुदीला डाळीची मागणी वाढल्यामुळे भविष्यातही दर चढे राहतील, अशी शक्यता आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात हरभऱ्याचा भाव वाढला

स्थानिक बाजारात मागील दोन महिन्यांपासून अपेक्षित भाव न मिळाल्यामुळे व्यापाऱ्यांना अडचण आली होती, परंतु आता भाव काही प्रमाणात वाढले आहेत.

याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारातही हरभऱ्याच्या दरात वाढ पहायला मिळत आहे. परिणामी, ऐन सणावाराच्या काळात हरभरा डाळीच्या दरात वाढ होत आहे. तर इतर डाळींचे दर स्थिर आहेत.

परराज्यातून मागणी वाढली

सणावाराच्या अधीच आलेल्या काळात परराज्यातूनही डाळीच्या मागणीत वाढ झाली आहे. आवक कमी असून, मागणी अधिक असल्यामुळे दर वाढल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

हे ही वाचा सविस्तर : Chana Market : हरभऱ्याच्या भावात जोरदार उसळी; जाणून घ्या सविस्तर

Web Title: latest news Chana Market: Chana prices surge; Farmers who have kept their stocks get good prices Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.