Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > Brinjal Market : पथ्रोटची हिरवी वांगी ओडिशा व छत्तीसगढात पोहोचली; शेतकऱ्यांना मिळाले लाखोंचे उत्पन्न

Brinjal Market : पथ्रोटची हिरवी वांगी ओडिशा व छत्तीसगढात पोहोचली; शेतकऱ्यांना मिळाले लाखोंचे उत्पन्न

latest news Brinjal Market : Pathrot's green brinjal reached Odisha and Chhattisgarh; Farmers got income worth lakhs | Brinjal Market : पथ्रोटची हिरवी वांगी ओडिशा व छत्तीसगढात पोहोचली; शेतकऱ्यांना मिळाले लाखोंचे उत्पन्न

Brinjal Market : पथ्रोटची हिरवी वांगी ओडिशा व छत्तीसगढात पोहोचली; शेतकऱ्यांना मिळाले लाखोंचे उत्पन्न

Brinjal Market : अचलपूर तालुक्यातील पथ्रोट गावातील हिरवी व जांभळी वांगी आता केवळ स्थानिकच नव्हे, तर ओडिशा आणि छत्तीसगढसह विविध राज्यांमध्ये पाठवली जात आहेत. यातून शेतकऱ्यांना मिळाले लाखोंचे उत्पन्न. (Brinjal Market)

Brinjal Market : अचलपूर तालुक्यातील पथ्रोट गावातील हिरवी व जांभळी वांगी आता केवळ स्थानिकच नव्हे, तर ओडिशा आणि छत्तीसगढसह विविध राज्यांमध्ये पाठवली जात आहेत. यातून शेतकऱ्यांना मिळाले लाखोंचे उत्पन्न. (Brinjal Market)

Brinjal Market : अचलपूर तालुक्यातील पथ्रोट गावातील हिरवी वांगी आणि जांभळ्या वांगी यांचे उत्पादन आता फक्त स्थानिकच नव्हे, तर ओडिशा आणि छत्तीसगढसह विविध राज्यांमध्येही पाठवले जाते.(Brinjal Market)

पथ्रोटच्या हिरव्या वांग्यांना विशेष मागणी असून, दररोज गावातून ट्रक भरून वांगी विविध बाजारपेठांमध्ये पोहोचतात.(Brinjal Market)

शेतकऱ्यांच्या पाच ते सहा महिन्यांत मेहनतीचे फायदे

जिल्ह्यातील मेळघाटच्या पायथ्याशी असलेल्या पथ्रोट गावातील शेतकरी सालभरच्या मेहनतीतून फक्त वांग्याच्या पिकातून लाखोंची उलाढाल करतात.

जून महिन्यात वांगी लावली जाते आणि ऑक्टोबर महिन्यापर्यंत नियमित तोडणी सुरु राहते. प्रत्येक आठवड्याला वांगी तोडली जाते. उदाहरणार्थ, गणेश कात्रे यांच्या एकरभर शेतात दर आठवड्याला १० ते १२ हजार रुपयांचे वांगी उत्पादन होते.

पूर्व विदर्भ आणि परराज्यातील पुरवठा

पथ्रोट गाव पूर्वी मिरची आणि कापसासाठी प्रसिद्ध होते. मागील २०-२५ वर्षांत येथे लागवड होणाऱ्या जांभळ्या वांग्यांसह हिरव्या वांग्यांची चव आणि दर्जा उत्तम असल्यामुळे नागपूर, भंडारा, तुमसर, गोंदिया, चंद्रपूर यासह विविध भागांमध्ये मागणी वाढली आहे.

शेतकऱ्यांकडून दररोज ६०-६६ ट्रक हिरव्या वांग्यांचा पुरवठा केला जातो. या वांग्या गोंदिया, नागपूर, बालाघाट, ओडिशा आणि इतर परप्रांतात विकल्या जातात.

पथ्रोट गावातील हिरवी वांगी हे स्थानिक आणि परराज्यातील बाजारपेठांमध्ये ओळख निर्माण करणारे उत्पादन ठरत आहे.

शेतकऱ्यांनी नियोजनबद्ध शेतीद्वारे काही महिन्यांत लाखोंची उलाढाल करून स्वतः चे उत्पन्न स्थिर केले आहे. त्यामुळे पथ्रोट गावाची ओळख आता हिरव्या वांग्यांच्या दर्जेदार उत्पादनासाठी झाली आहे.

पथ्रोटच्या हिरव्या वांग्यांची चव आणि दर्जा खरोखरच विशेष आहे. या भागातील वांग्यांना मागणी वर्षभर असते. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हे पिक महत्त्वपूर्ण उत्पन्नाचा स्रोत बनले आहे.- भूषण पंडेकर, वांगी खरेदीदार, व्यापारी

हे ही वाचा सविस्तर :Soybean Kharedi : शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी; सोयाबीन खरेदीचा ठरला मुहूर्त वाचा सविस्तर

Web Title: latest news Brinjal Market : Pathrot's green brinjal reached Odisha and Chhattisgarh; Farmers got income worth lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.