Bijwai Soybean Market Update : सातत्याने झालेल्या मुसळधार पावसामुळे सोयाबीनच्या शेतांमध्ये पाणी साचले, झाडावरील शेंगांची कोंब फुटली आणि एकरी उत्पादन निम्म्याहून अधिक कमी झाले आहे. बाजारात जेमतेम मिळणारे भाव पाहता, शेतकरी दिवाळीच्या आनंदाऐवजी आर्थिक तणावात सापडले आहेत.(Bijwai Soybean Market Update)
यंदा वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सोयाबीन उत्पादन आणि बाजारपेठ दोन्ही बाजूंनी आव्हानात्मक ठरली आहे. सातत्याने झालेल्या अतिवृष्टी, मुसळधार पाऊस आणि पूर परिस्थितीमुळे सोयाबीनचे एकरी उत्पादन ४ ते ५ क्विंटलने घटले असून, बाजारात सोयाबीनला ३ हजार ६८० ते ४ हजार ३७० रुपये प्रतिक्विंटल इतकाच भाव मिळत आहे.(Bijwai Soybean Market Update)
बिजवाई सोयाबीनचे दर थोडे जास्त असले तरी उत्पादन नगण्य असल्यामुळे सर्व शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळत नाही. परिणामी, ऐन दिवाळीच्या तोंडावर अनेक शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडले आहेत.(Bijwai Soybean Market Update)
भाव आणि आवक
वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये १५ ऑक्टोबर रोजी सोयाबीनची एकूण आवक २ हजार ८९० क्विंटल नोंदवली गेली. साध्या सोयाबीनचे दर ३ हजार ६८० ते ४ हजार ३७० रुपये प्रतिक्विंटल तर बिजवाई सोयाबीनला ४ हजार ४१० ते ५ हजार रुपये प्रतिक्विंटल इतका भाव मिळाला.
बिजवाई सोयाबीन म्हणजे पुढील हंगामात लागवड होणारे उच्च दर्जाचे बियाणे. रोगप्रतिकारक व उच्च उत्पन्न देणारे या वाणाचे फायदे असल्यामुळे त्याची मागणी जास्त आहे. मात्र यंदा खराब हवामानामुळे बिजवाई सोयाबीन उत्पादन अगदीच कमी राहिले असून, शेतकऱ्यांना वाढीव दराचा फायदा मिळणे अशक्य झाले आहे.
एकरी उत्पादनात घट
सातत्याने झालेल्या अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे शेतांमध्ये पाणी साचले असून, झाडावरील शेंगांची कोंब फुटण्याचे प्रकार घडले. यामुळे एकरी अॅव्हरेज उत्पादन २ ते ४ क्विंटल इतकेच राहिले, जे गतवर्षीच्या तुलनेत निम्म्यापेक्षा अधिक कमी आहे.
मजुरीचे दर गगनाला
सोयाबीन सोंगणीसाठी मजुरांचे दर सध्या ४ हजार ते ५ हजार रुपये प्रति एकर इतके आहेत. या परिस्थितीत शेतकऱ्यांचा कंबरडे मोडल्यागत आर्थिक तणाव निर्माण झाला आहे.
बिजवाई सोयाबीनचे महत्त्व
पुढील खरीप हंगामासाठी बियाणे म्हणून वापरता येते
रोगप्रतिकारक आणि दर्जेदार
उच्च उत्पन्न देणारे वाण
मागणी जास्त असल्यामुळे बाजारात अधिक दर मिळतात.
वाण | कमीत कमी दर (₹) | जास्तीत जास्त दर (₹) |
---|---|---|
साधे सोयाबीन | ३,६८० | ४,३७० |
बिजवाई सोयाबीन | ४,४१० | ५,००० |
शेतकऱ्यांसमोर आव्हान
खराब हवामानामुळे उत्पादन घटले
मजुरीचे उच्च दर
बाजारात जेमतेम कवडीमोल भाव
ऐन दिवाळीच्या तोंडावर आर्थिक विवंचना.
वाशिम कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांच्या हाती अधिक पैसे कसे येतील, यावर विचार करत असून, बिजवाई सोयाबीनच्या मागणीमुळे तुलनेने काही लाभ होऊ शकतो.
हे ही वाचा सविस्तर : Soybean Bajar Bhav : बाजारात सोयाबीनची सर्वाधिक आवक; जाणून घ्या कसा मिळाला दर