Join us
Daily Top 2Weekly Top 5

चांगल्या प्रतिच्या बेदाण्याला किती रुपयांचा दर, मागीलवर्षी पेक्षा यंदा किलोचे दर कसे आहेत? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 12:30 IST

Bedana Market : बेदाणा उत्पादनात घट झाली असून यासर्षी उपादन सुमारे ३५ टक्क्यांनी कमी आहे.

नाशिक : अवकाळी पावसामुळे द्राक्षांना बसलेल्या फटक्यामुळे बेदाणा उत्पादनात घट झाली असून यासर्षी उपादन सुमारे ३५ टक्क्यांनी कमी आहे. त्यामुळे भागील वर्षाच्या तुलनेत दरांमध्ये दुप्पट वाढ झाली आहे. सध्या चांगल्या प्रतिच्या बेदाण्याला ३०० ते ४०० रुये किलोचा दर मिळत आहे. मागीलवर्षी १५० ते २०० रुपये असलेला दर सध्या दुपटीवर गेला आहे.

नाशिक जिल्ह्यातील बेदाणा निर्मितीचा यंदाचा हंगाम अपेक्षेपेक्षा लवकर आटोपला आहे. द्राक्षाच्या टंचाईमुळे यंदा बेदाण्याच्या उत्पादनामध्ये ३५ टक्क्यांनी घट झाल्याचे सांगितले जात आहे. साधारणपणे दोन ते अडीच महिने चालणारा हा हंगाम यंदा अवघ्या दीड महिन्यात संपुष्टात आला आहे. सध्या केवळ पाच टक्के शेडवरच बेदाणा निर्मिती सुरू असून, येत्या आठवड्यात हंगाम पूर्णपणे बंद होण्याची चिन्हे आहेत.

यंदाच्या हंगामाच्या सुरुवातीपासूनच द्राक्षाची टंचाई भासत होती. त्यातच अवकाळी पाऊस आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे द्राक्ष उत्पादनावर मोठा विपरित परिणाम झाला. अनेक द्राक्षबागा पूर्णपणे तुटल्या, तर काही ठिकाणी घडच न लागल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. परिणामी, बेदाणा निर्मितीसाठी लागणारा कच्चा मालच उपलब्ध झाला नाही.

तीन हजारांहून अधिक शेडनाशिक जिल्ह्यात बेदाणा निर्मिती मोठ्या प्रमाणावर होत असते. येथे सुमारे तीन हजारांहून अधिक शेड आहेत. डिसेंबरपासून बेदाणा निर्मितीचे नियोजन सुरू होते, तर जानेवारीच्या मध्यापासून हंगामाला वेग येतो. मात्र, यंदा हंगाम उशिरा सुरु झाला आणि सुरुवातीपासूनच अडचणींचा सामना करावा लागला. द्राक्षाच्या टंचाईमुळे केवळ ५० टक्के शेडवरच काम सुरू झाले, त्यामुळे उत्पादनावर थेट परिणाम झाला.

उत्पादनामध्ये ३५ टक्क्यांनी घटगतवर्षी राज्यात २ लाख ८४ हजार ६६६ टन बेदाण्याचे उत्पादन झाले होते. यंदा मात्र उत्पादनात सुमारे ३५ टक्क्यांपर्यंत घट झाल्याचा प्राथमिक अंदाज उद्योगातील जाणकारांनी व्यक्त केला आहे. सुरुवातीला मार्चच्या पहिल्या आठवड्यात २५ टक्के घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती, मात्र त्यानंतर परिस्थिती आणखी गंभीर बनली. एप्रिल महिन्याअखेर बेदाणा उत्पादनामध्ये ३५ टक्क्यांनी घट झाली आहे.

द्राक्षाला चांगला दर असल्याने विक्रीला प्राधान्यद्राक्षाला यंदा चांगला बाजारभाव मिळाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी बेदाणा निर्मितीकडे वळण्याऐवजी थेट द्राक्ष विक्रीला प्राधान्य दिले. त्यामुळे बेदाणा उद्योगासाठी उपलब्ध होणाऱ्या द्राक्षाचे प्रमाण आणखी कमी झाले. याचा थेट परिणाम हंगामाच्या कालावधीवर झाला. दरम्यान, बाजारात बेदाण्याची मागणी कायम असून, पुरवठा कमी असल्याने दरात वाढ झाली आहे. काही ठिकाणी अजूनही २५ ते ३५ शेडवर काम सुरू असले, तरी ते अत्यंत मर्यादित आहे. त्यामुळे उत्पादन घटले असले, तरी दरवाढीमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे.

 

 

PM Kisan Scheme : नवीन शेती घेतली आहे तर, आता पीएम किसान योजनेचा लाभ घेता येईल का? काय आहेत नियम

 

टॅग्स :द्राक्षेमार्केट यार्डकृषी योजनाशेती