Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > Banana Market: केळी बाजारात नेमकं काय चाललंय? जाणून घ्या सविस्तर

Banana Market: केळी बाजारात नेमकं काय चाललंय? जाणून घ्या सविस्तर

latest news Banana Market: What is really happening in the banana market? Find out in detail | Banana Market: केळी बाजारात नेमकं काय चाललंय? जाणून घ्या सविस्तर

Banana Market: केळी बाजारात नेमकं काय चाललंय? जाणून घ्या सविस्तर

Banana Market : केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी सध्या बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. अचानक केळीच्या दरात मोठी घसरण झाली असून, काही व्यापाऱ्यांनी युद्धस्थितीचा फायदा घेत दर पाडल्याचा आरोप होत आहे. यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे.(Banana Market)

Banana Market : केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी सध्या बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. अचानक केळीच्या दरात मोठी घसरण झाली असून, काही व्यापाऱ्यांनी युद्धस्थितीचा फायदा घेत दर पाडल्याचा आरोप होत आहे. यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे.(Banana Market)

Banana Market : इराणमधील युद्धस्थितीचा परिणाम देशांतर्गत बाजारावर होत असल्याचे सांगत केळीच्या दरात मोठी घसरण झाल्याची बाब समोर आली आहे.(Banana Market)

या परिस्थितीचा गैरफायदा घेत व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची आर्थिक लूट होत असल्याचा गंभीर आरोप माजी आमदार राहुल मोटे यांनी केला आहे.(Banana Market)

केळीच्या दरात मोठी पडझड

पूर्वी प्रति किलो सुमारे २५ रुपये दराने विक्री होणारी केळी सध्या थेट ६ ते १० रुपये प्रति किलो दराने विकली जात आहे.

या अचानक झालेल्या दरकपातीमुळे केळी उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत.

युद्धस्थितीचा आधार; व्यापाऱ्यांवर आरोप

इराण मध्ये सुरू असलेल्या युद्धस्थितीचा आधार घेत काही व्यापाऱ्यांनी जाणूनबुजून दर पाडल्याचा आरोप करण्यात आला आहे.

विशेषतः रमजान महिन्यात केळीला चांगली मागणी असते, तरीही दर कमी करण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.

उत्पादन क्षेत्रात मोठा फटका

जळगाव, सोलापूर, पुणे आणि धाराशिव या जिल्ह्यांसह भूम-परांडा-वाशी भागात केळीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. या भागातील शेतकऱ्यांना दरकपातीचा सर्वाधिक फटका बसत आहे.

निर्यात कमी, बाजारपेठेवर दबाव

महाराष्ट्र देशातील आघाडीचा केळी उत्पादक राज्य असले तरी एकूण उत्पादनापैकी फक्त १% केळी निर्यात होते. 

यामुळे स्थानिक बाजारावर मोठा ताण येतो आणि दर घसरतात.

शेतकऱ्यांसाठी संकटाची घंटा

दरकपातीमुळे उत्पादन खर्चही वसूल होत नाही

शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान

बाजारातील अस्थिरता वाढली

शासनाकडे काय केली मागणी?

माजी अमदार राहुल मोटे यांनी राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे निवेदन देत मागणी केली आहे.

* संबंधित व्यापाऱ्यांवर कारवाई करावी

* बाधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी

* अनुदानासाठी विशेष उपाययोजना कराव्यात

युद्धस्थितीचा परिणाम आणि बाजारातील अस्थिरता यामुळे केळी उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. योग्य वेळी शासनाने हस्तक्षेप न केल्यास शेतकऱ्यांचे नुकसान आणखी वाढण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा सविस्तर : Hingoli Halad Project : हळद उत्पादकांसाठी खुशखबर; हिंगोलीत उभारणार ५ हजार टन क्षमतेचे भव्य गोदाम

अधिक वाचा : Hirakani Haat Latur :'हिरकणी हाट' ठरतेय हिट; ग्रामीण उत्पादनांना शहरात दणदणीत प्रतिसाद

Web Title: latest news Banana Market: What is really happening in the banana market? Find out in detail