Banana demand in Shravan : पाकिस्तान व इराण-इस्राईल संघर्ष संपल्यानंतर भारतातून केळीची निर्यात पुन्हा वेग घेतला असून, यंदा अर्धापूर तालुक्यातील केळी परदेशी बाजारात मोठ्या प्रमाणावर पोहोचत आहे. निर्यातीला चांगला दर मिळत असल्याने केळी उत्पादकांना दिलासा मिळाला आहे. (Banana demand in Shravan)
निर्यातीचे दर २ हजार ते २ हजार २०० रुपये प्रतिक्विंटल इतके स्थिर असून, काही ठिकाणी शेतकऱ्यांना थेट २ हजार ५०० रुपयांपर्यंत दरही मिळत आहे. (Banana demand in Shravan)
श्रावण महिन्यात देशांतर्गत बाजारातही मागणी वाढली असून, केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही पर्वणीच ठरत आहे.(Banana demand in Shravan)
पाकिस्तान आणि इराण-इस्राईल संघर्षामुळे काही काळ खोळंबलेली केळी निर्यातीला पुन्हा गती मिळाली आहे. (Banana demand in Shravan)
यंदा शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बाब म्हणजे निर्यात दर २ हजार ते २ हजार २०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत स्थिर असून, उच्च प्रतीची नांदेड जिल्ह्यातील केळी परदेशी बाजारात मोठ्या प्रमाणात पोहचत आहे. (Banana demand in Shravan)
अर्धापूर हा निर्यातीमध्ये आघाडीवर असून, शेतकरी, व्यापारी आणि निर्यातदार यांच्यात उत्साहाचे वातावरण आहे.(Banana demand in Shravan)
१५ ते २० दिवसांची प्रक्रिया, दर्जेदार केळीला अधिक मागणी
केळीची निर्यात प्रक्रिया साधारणतः १५ ते २० दिवसांची असून, केवळ दर्जेदार, टिकाऊ व दीर्घकाळ टिकणाऱ्या केळीचीच निवड केली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादनापासूनच काटेकोर काळजी घ्यावी लागते.
अर्धापूर, मालेगाव व दाभड मंडळात मोठ्या प्रमाणात केळीचे उत्पादन होत असून, अन्य राज्यांतील व्यापारीही येथे खरेदीसाठी येत आहेत.
श्रावणामुळे देशांतर्गत बाजारातही मागणी वाढली
श्रावण महिन्यामुळे देशांतर्गत बाजारातही केळीला जोरदार मागणी आहे. उपवास व फलाहारामुळे केळीच्या खरेदीत लक्षणीय वाढ झाली आहे.
विशेषतः अर्धापूर तालुक्यातील केळीची चव आणि टिकाव यामुळे स्थानिक बाजारातही दर वधारले आहेत. सध्या जिल्ह्यात ४० ते ५० रुपये डझन दराने केळी विकली जात आहे.
कमिशनशिवाय दर २ हजार ५०० रुपयेही शक्य
व्यापाऱ्यांच्या माहितीनुसार, केळीच्या दर्जानुसार काही ठिकाणी कमिशनशिवाय थेट शेतकऱ्यांना २ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत दर मिळू शकतो.
मात्र, सध्याच्या प्रक्रियात्मक खर्चामुळे सरासरी दर २ हजार ते २ हजार २०० रुपये प्रतिक्विंटल इतका मिळतो आहे.
निर्यात वाढण्याची शक्यता
निर्यात सुरळीत सुरू राहिल्यास पुढील काही आठवड्यांत अधिक प्रमाणात केळी परदेशात जाईल अशी अपेक्षा आहे. यामुळे शेतकऱ्यांना अधिक फायदा होईल. यावर्षीची केळी निर्यात ही शेतकऱ्यांसाठी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरण्याची चिन्हे आहेत.