Join us

Assembly Election : आज विधानसभा निवडणूक मतदान, लासलगाव मार्केटला कांदा लिलाव बंद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2024 13:47 IST

Lasalgaon Kanda Market : मतदानाच्या पार्श्वभूमीवर लासलगाव कांदा मार्केट (Lasalgaon Kanda Market) बंद ठेवण्यात आले आहेत.

नाशिक : विधानसभा निवडणुक मतदानाच्या पार्श्वभूमीवर लासलगाव कांदा मार्केट (Lasalgaon Kanda Market) बंद ठेवण्यात आले आहेत. या बाजार समिती अंतर्गत होणारी एक दिवसाची कांदा उलाढाल यानिमित्ताने ठप्प होईल. मात्र जिल्ह्यातील इतर निवडक बाजार समित्यांमध्ये लिलाव सुरु राहणार आहेत. 

आज विधानसभेसाठी राज्यभरात मतदान (Vidhansabha Election) प्रक्रिया पडत आहे. त्यामुळे अनेक शासकीय कार्यालये, शाळा यांना सुट्ट्या देण्यात आल्या आहेत. तसेच इतरही कार्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. दुसरीकडे बाजार समित्यांमध्ये देखील लिलावामुळे शेतकऱ्यांची मोठी गर्दी असते. आठवडे बाजारामुळे मतदानावर परिणाम होऊ नये म्हणून बुधवारी भरणारे लासलगाव बाजार समिती बंद ठेवण्यात आली आहे. 

लासलगाव कांदा मार्केट देशभरात प्रसिद्ध आहे. एका दिवसात कोटींची उलाढाल या बाजार समितीत होत असते. अशा स्थितीत मतदान प्रक्रिया पार पडत असल्याने लिलाव बंद ठेवण्यात आले आहेत. याचबरोबर भुसार आणि तेलबियांचे लिलाव देखील बंद राहणार आहेत. मात्र भाजीपाला शेतमालाचे लिलाव सुरु राहणार आहेत. याची सर्व शेतकरी बांधवानी नोंद घ्यायची असल्याचे आवाहन बाजार समिती प्रशासनाकडून करण्यात आले आहे. 

गिरणारे टोमॅटो मार्केट सायंकाळी खुले 

नाशिक जिल्ह्यातील (Nashik Kanda Market) पिंपळगाव टोमॅटो मार्केटनंतर महत्वाचे मार्केट असलेले गिरणारे टोमॅटो मार्केट देखील बंद आहे. आज विधानसभेसाठी मतदान प्रक्रिया राबवली जात असताना अनेक कृषी बाजार समित्या बंद आहेत. गिरणारे मार्केटमध्ये टोमॅटोची मोठी आवक होत असते. दिवसभरात लाखोंची उलाढाल या मार्केटमधून होत असते. मात्र मतदान प्रक्रियेमुळे लिलाव बंद आहेत. मात्र सायंकाळी सहा वाजेनंतर लिलाव सुरु करण्यात येणार असल्याची माहिती आहे. 

हेही वाचा : Market yard close : २४ नोव्हेंबरपर्यंत कारंजा, रिसोड बाजार समितीचे व्यवहार राहणार बंद

टॅग्स :कांदाशेती क्षेत्रमार्केट यार्डनाशिकविधानसभा