Rabbi Crops MSP : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आर्थिक घडामोडींच्या मंत्रिमंडळ समितीने (CCEA) विपणन हंगाम २०२६-२७ साठी सर्व अनिवार्य रब्बी पिकांसाठी किमान आधारभूत किंमतींमध्ये (MSP) वाढ करण्यास मान्यता दिली आहे.
शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनांना योग्य भाव मिळावा, यासाठी सरकारने २०२६-२७ च्या विपणन हंगामासाठी रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ केली आहे. करडईसाठी प्रति क्विंटल ६०० रुपये, त्यानंतर मसूरसाठी प्रति क्विंटल ३०० रुपये अशी सर्वाधिक किमान आधारभूत किमतीत वाढ जाहीर करण्यात आली आहे.
तसेच गहू पिकासाठी १६० रुपये, हरभरा पिकासाठी २२५ रुपये, मसूर पिकासाठी ३०० रुपये, मोहरीसाठी २५० रुपये, करडईसाठी ६०० रुपये तर जव किंवा सातूसाठी १७० रुपये अशी वाढ करण्यात आली आहे.
पीकनिहाय किमान आधारभूत किंमत पाहुयात (२०२६-२७)
- गहू - २५८५ रुपये प्रति क्विंटल
- हरभरा - ५८७५ रुपये प्रति क्विंटल
- मसूर - ७ हजार रुपये प्रति क्विंटल
- मोहरी - ६ हजार २०० रुपये प्रति क्विंटल
- जव किंवा सातू - २१५० रुपये प्रति क्विंटल
- करडई - ६ हजार ५४० रुपये प्रति क्विंटल
अशा पद्धतीने रब्बी हंगामातील वरील पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ करण्यात आली आहे.