Lokmat Agro >बाजारहाट > Amchur Market : आमचूरचे दर 30 टक्क्यांनी घसरले, सध्या बाजारात काय दर मिळतोय? वाचा सविस्तर 

Amchur Market : आमचूरचे दर 30 टक्क्यांनी घसरले, सध्या बाजारात काय दर मिळतोय? वाचा सविस्तर 

Latest News Amchur Market Prices of amchur have dropped by 30 percent, see market prices Read in detail | Amchur Market : आमचूरचे दर 30 टक्क्यांनी घसरले, सध्या बाजारात काय दर मिळतोय? वाचा सविस्तर 

Amchur Market : आमचूरचे दर 30 टक्क्यांनी घसरले, सध्या बाजारात काय दर मिळतोय? वाचा सविस्तर 

Amchur Market : सातपुड्यातील धडगाव आणि मोलगी येथे देशातील दुसऱ्या क्रमांकाची आमचूर उत्पादन (Amchur Production) करणारी बाजारपेठ आहे.

Amchur Market : सातपुड्यातील धडगाव आणि मोलगी येथे देशातील दुसऱ्या क्रमांकाची आमचूर उत्पादन (Amchur Production) करणारी बाजारपेठ आहे.

शेअर :

Join us
Join usNext

- भूषण रामराजे 

नंदुरबार : सातपुड्यातील गावठी आंब्यापासून (Gavthi Ambe) तयार होणाऱ्या आमचूरच्या हंगामाला यंदा कमी झालेल्या दरांमुळे सूर गवसत नसल्याने आंबा उत्पादकांचे आर्थिक नुकसान होत आहे. बाजारात चांगल्या दर्जाच्या आमचूरलाही (Amchur) योग्य असा भाव मिळत नसल्याने आमचूर उत्पादक बाजारापासून लांब राहणे पसंत करत आहेत. बाजारावर पसरलेली अवकळा आदिवासींच्या रोजगारासह उलाढालीवर परिणाम करत आहे.

सातपुड्यातील गावठी आंब्यापासून (Mango Season) तयार होणारा आमचूर उत्तर भारतासह पूर्वेकडील राज्यांत प्रसिद्ध आहे. नैसर्गिक पद्धतीने सातपुड्यात जागोजागी उगवलेल्या आंबा झाडांवरील कैरी तोडून आणत सोलून त्याच्या खापा करून सुकवत त्याची बाजारात विक्री करण्यात येते. या सुकवलेल्या खापांना 'आमचूर' असे म्हटले जाते. या आमचूरच्या उत्पादनासाठी धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यांत गावोगावी आदिवासी कुटुंब एप्रिल अखेरपासून सुरुवात करतात. 

यंदा आंबा मोहर प्रारंभीपासून चांगला असल्याने हंगाम चांगला जाण्याची अपेक्षा होती. उत्तर भारतातील व्यापारी आधीपासून संपर्कात असल्याने हंगाम चांगला जाण्याचा अंदाज होता, मात्र, मे महिन्याच्या प्रारंभीच आमचूरचे दर कोलमडल्याने धडगाव आणि मोलगी येथील बाजारात आवक कमी झाली आहे. अपेक्षित दर नसल्याने आदिवासींकडून आमचूर तयार करण्याची प्रक्रिया कमी करण्यात आल्याचे व्यापारी सांगत आहेत.

मागील वर्षाच्या तुलनेत आमचूर दर झाले कमी
उत्तर भारतातील व्यापाऱ्यांना देशातील इतर भागात आमचूर मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाल्याने २०२३ च्या हंगामात आमचूरला १५० पासून ३२० रुपये प्रतिकिलो भाव मिळाला होता. परंतु, २०२४ हंगामात या दरात घसरण झाली होती. यातून आमचूरला २६० ते २७० रुपये किलोचा भाव मिळाला होता. यंदा यात वाढ अपेक्षित होती.

या मालाला मिळतो सर्वाधिक उठाव
सातपुड्यातील धडगाव आणि मोलगी येथे देशातील दुसऱ्या क्रमांकाची आमचूर उत्पादन करणारी बाजारपेठ आहे. सातपुड्यातील आमचूर हा मसाल्याचा पदार्थ आहे. त्याला जागतिक पातळीवर भौगोलिक मानांकन जाहीर झाले आहे. त्यामुळे आमचूरला चांगला भाव मिळेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना असताना यंदा भाव घसरले आहेत. यामुळे उत्पादन कमी झाले आहे.

देशात राज्यातील छत्तीसगड जिल्ह्यात जगदलपूर, सयपूर, संबलपूर हौ आमचूरची प्रथम क्रमांकाची बाजारपेठ आहे. त्यानंतर दुस्वार जिल्ह्यातील धडगाव आणि मोलगी आमचूरसाठी देशात प्रसिद्ध आहेत. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात, राजस्थान, आंध्र प्रदेश या राज्यांमधील अनेक ठिकाणी आमचूरची खरेदी केली जाते. चवदार खाद्यपदार्थ तसेच औषथ निर्मितीसाठी आमचूरची खरेदी केली जाते. त्यामुळेच सातपुड्यातील आमचूरला मोठी मागणी असते. याठिकाणी आमचूर खरेदी करण्यासाठी देशभरातील व्यापारी येत असतात. सातपुड्यातील आमचूर दिल्ली, जयपूर, इंदोर, अहमदाबाद, मुंबई व छिंदवाडा आदी ठिकाणी रवाना होते. मसाल्याचा पदार्थ म्हणून आमचूरची उत्तर भारतातील व्यापारी येथील आमचूर खरेदी करतात.

हंगामाच्या प्रारंभीच २०० रुपये दर
जेवढी परिपक्व कैरी तेवढी आमचूरला सफेदी अधिक असते. या सफेदीनुसार आमचूरला भाव मिळतो. बंदा कैरी चांगली असल्याने लांब आकाराचा फाफडा आमचूर प्रथम बाजारात आला होता. परंतु, त्याला थेट २०० रुपये प्रतिकिलो दर मिळाला होता. या मालाला साधारण २३० ते २५० रुपये दर अपेक्षित होता. मात्र प्रारंभीच दर कोसळले आहेत. सध्या दुय्यम प्रतीचा आमचूर १४० ते १५० रुपये तर लालसर रंगाचा आमचूर ८० ते २० रुपये किलो दराने उपलब्ध आहे.

सातपुड्यातील गावपाड्यात, असे तयार होते आमचूर
धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यांत डोंगराळ व दुर्गम भाग मोकळ्या प्रमाणावर आहे. याठिकाणी आंब्याची झाडे मोठ्या प्रमाणावर आहेत. त्याठिकाणी स्थानिक लोक हे आंबे झाडावरून काढून साल हाताने कापल्यावर ते सुकवले जाते. त्यानंतर बाजारात विक्रीसाठी नेले जाते. त्यामुळे तेथील स्थानिक नागरिकांना मोठा रोजगार मिळतो. दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांमध्ये आमचूरच्या विक्रीसाठी लगबग सुरू आहे. त्यामुळे बाजारपेठा गजबजल्या आहेत.

बाजारात आमचूरची आवक कमी झाली आहे. दर कमी असल्याने उत्पादक माल तयार करण्यास उत्सुक नाहीत. परराज्यातील व्यापारीही मालाला भाव कमी देत आहेत. माल दर्जेदार असतानाही दर कमी आहेत.
- संतोष भोई, आमचूर खरेदीदार, धडगाव.

Web Title: Latest News Amchur Market Prices of amchur have dropped by 30 percent, see market prices Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.