छत्रपती संभाजीनगर : अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर बाजारात आंब्यांची जोरदार आवक झाली असून, मागील आठवडाभरात सुमारे २५० टन आंब्यांची विक्री झाली आहे.(Akshaya Tritiya Mango Market)
बाजारपेठेत सर्वत्र आंब्यांची रेलचेल दिसत असून, घरोघरी आमरस, भजे आणि कुरडईचा पारंपरिक बेत रंगत आहे. (Akshaya Tritiya Mango Market)
बाजारपेठेत आंब्यांचा सण
फेब्रुवारीच्या पहिल्या पंधरवड्यापासून आंब्याची आवक सुरू झाली असली तरी अक्षय तृतीयेपासून खरेदीला अधिक वेग आला आहे.
जाधववाडी अडत बाजारात मागील १५ दिवसांपासून मोठ्या प्रमाणात कच्च्या आंब्याची आवक होत असून, ते पिकवून विक्रीसाठी बाजारात आणले जात आहेत. शनिवारी शहरातील बाजारपेठेत सर्वत्र आंब्यांचेच ढीग पाहायला मिळाले.
'या' राज्यांतून येतोय आंबा
सध्या बाजारात विविध राज्यांतून आंबा दाखल होत आहे.
आंध्र प्रदेश, कर्नाटक तसेच केशर आंबा प्रामुख्याने गुजरातमधून येत असून, हापूस आंब्याच्या तुलनेत कर्नाटकातील हापूसची बाजारात अधिक आवक दिसून येते.
बाजारातील प्रमुख आंब्यांचे प्रकार
हापूस, लालबाग, केशर, दशेरी, बदाम, लंगडा
आंब्यांचे दर (प्रति किलो/डझन अंदाजे)
| आंब्याचा प्रकार | दर (प्रति किलो/डझन) |
|---|---|
| हापूस | ५०० ते १,४०० रुपये (डझन) |
| लालबाग | १२० ते २०० रुपये |
| केशर | २०० ते ३०० रुपये |
| दशेरी | १६० ते २२० रुपये |
| लंगडा | १४० ते १५० रुपये |
ग्राहकांची पसंती बदलली
अक्षय तृतीयेनिमित्त १ ते ५ किलोपर्यंत आंबा खरेदी करणाऱ्यांची संख्या अधिक असल्याचे दिसून आले.
हापूस आंब्याबाबत ग्राहकांमध्ये गुणवत्ता आणि किंमतीबाबत शंका असल्याने केवळ १० टक्के ग्राहक हापूस खरेदी करत आहेत.
तर सुमारे २० टक्के ग्राहक केशर आणि लालबाग आंब्याला पसंती देत आहेत. उर्वरित ग्राहक दशेरी, बदाम आणि लंगडा या प्रकारांकडे वळताना दिसत आहेत.
हापूस महाग असल्याने आणि खात्रीबाबत शंका असल्याने ग्राहक केशर किंवा लालबागकडे जास्त वळत आहेत.- शेख माजिद, आंबा विक्रेते
घरोघरी आमरसाचा आस्वाद
अक्षय तृतीया म्हटली की आमरस हा जणू परंपरेचाच भाग. त्यामुळे शहरात सर्वत्र आमरस-भजे-कुरडईचा बेत आखला जात असून, आंब्यांच्या वाढत्या आवकीमुळे ग्राहकांना विविध पर्याय उपलब्ध झाले आहेत.
अक्षय तृतीयेच्या निमित्ताने शहरात आंब्यांची मोठी उलाढाल होत असून, विविध राज्यांतून येणाऱ्या आंब्यांमुळे बाजारपेठ गजबजली आहे. बदलत्या पसंतीमुळे केशर आणि लालबाग आंब्यांना अधिक मागणी मिळत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
Web Summary : Akshaya Tritiya sees a mango market surge in Chattrapati Sambhajinagar. 250 tons sold. While Hapus faces quality doubts, Kesar and Lalbag mangoes gain popularity. Customers favor diverse varieties like Dasheri and Langda over the expensive Hapus.
Web Summary : अक्षय तृतीया पर छत्रपति संभाजीनगर में आम बाजार में उछाल। 250 टन की बिक्री हुई। हापुस की गुणवत्ता पर संदेह के कारण, केसर और लालबाग आम लोकप्रिय हो रहे हैं। ग्राहक महंगे हापुस के बजाय दशहरी और लंगड़ा जैसे किस्मों को पसंद करते हैं।