Paddy Procurement : एकीकडे भाताची किंवा धानाच्या काढणीला सुरुवात झाली असून महाराष्ट्रातील नाशिकसह विदर्भातील धान पट्ट्यातील शेतकरी कामात व्यस्त आहेत. दुसरीकडे धान विक्रीसाठी देखील राज्यातील शेतकरी तयारीत आहेत. अशातच आंध्र प्रदेश सरकारने तेथील धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी धान विक्रीसाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे.
२०२५-२६ च्या खरीप हंगामातील धान विक्रीला लवकरच सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी आंध्र प्रदेश सरकारने तेथील शेतकऱ्यांना थेट व्हॉट्सअॅपद्वारे धान विक्रीची नोंदणी करण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. ज्याद्वारे शेतकरी व्हॉट्सॲपद्वारे नोंदणी करू शकतील, ४८ तासांच्या आत पेमेंट जमा केले जातील आणि संपूर्ण प्रक्रिया पूर्णपणे कागदविरहित असणार आहे.
या पार्श्वभूमीवर आंध्र प्रदेश नागरी पुरवठा मंत्री एन. मनोहर यांनी शुक्रवारी सांगितले की, राज्य सरकारने २०२५-२६ च्या खरीप हंगामात ५.१ दशलक्ष टन धान खरेदीचे लक्ष्य ठेवले आहे. गेल्या वर्षी, राज्याने ३.४ दशलक्ष मेट्रिक टन धान्य खरेदी केले होते. दरम्यान ३५ बँकांद्वारे १:२ च्या प्रमाणात बँक हमीची व्यवस्था केली जाईल आणि कामकाजाच्या आव्हानांना तोंड देणाऱ्या जिल्ह्यांमध्ये रिअल-टाइम देखरेख लागू केली जाईल. खरेदी सुधारणांवर प्रकाश टाकताना त्यांनी सांगितले की,
तसेच गिरणी मालकांना आर्द्रता मोजणारी यंत्रे, वाहतूक सुविधा आणि दर्जेदार पिशव्या आगाऊ तयार करण्याची सूचना देण्यात आली आहे. २७ ऑक्टोबर रोजी आंध्र प्रदेशात धान्य खरेदी सुरू होईल. मनोहर यांनी सांगितले की, ३ हजारहून अधिक रायथू सेवा केंद्रे, अंदाजे २००० प्राथमिक खरेदी केंद्रे आणि अंदाजे १० हजार कर्मचारी धान संकलन सुलभ करण्यासाठी तैनात केले जातील.
मोबाईल 'रायथू बाजार' सुरू करण्याचे आवाहनयापूर्वी राज्यातील शेतकरी आणि ग्राहकांसाठी कृषी बाजारपेठांचे आधुनिकीकरण आणि मोबाईल 'रायथू बाजार' किंवा मोबाईल शेतकरी बाजारपेठ सुरू करण्याचे आवाहन केले होते. अधिकाऱ्यांना 'रायथू बाजार'साठी एक मास्टर प्लॅन तयार करण्याचे आणि शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी योग्य भाव मिळण्याची खात्री करण्याचे निर्देश दिले.
Read More : कमी दिवसांत चांगलं उत्पन्न देणारी तिळाची शेती, लागवडीपासून ते काढणीपर्यंतची संपूर्ण माहिती
Web Summary : Andhra Pradesh enables WhatsApp registration for paddy sales for farmers. Payment will be processed within 48 hours. The state aims to purchase 5.1 million tonnes of paddy this season, streamlining procurement and ensuring fair prices.
Web Summary : आंध्र प्रदेश ने किसानों के लिए व्हाट्सएप पर धान बिक्री पंजीकरण शुरू किया। 48 घंटे में भुगतान होगा। राज्य का लक्ष्य इस सीजन में 5.1 मिलियन टन धान खरीदना है, जिससे खरीद प्रक्रिया सुव्यवस्थित होगी और उचित मूल्य सुनिश्चित किया जाएगा।