Join us
Daily Top 2Weekly Top 5

पुणे बाजार समितीत फळांना काय बाजारभाव मिळाला? आजचे फळ बाजारभाव 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2024 19:42 IST

आज पुणे बाजार समितीमध्ये फळांचे बाजारभाव काय मिळाले, हे जाणून घेऊया..

आज रविवार असल्याने अनेक बाजार समित्यामध्ये लिलाव बंद होते. तर काही बाजार समित्यांमध्ये लिलाव पार पडले. त्यानुसार आजचे फळांची आवकही  झाल्याचे दिसून आले. त्यानुसार फळांचे आजचे बाजारभाव पाहूया. आज केवळ पुणे बाजार समितीत काय बाजारभाव मिळाले, हे जाणून घेऊया... 

आजचे फळांचे बाजारभाव तर पाहिले असता आजच्या दर अहवालानुसार पुणे बाजार समितीत डाळींबची 637 क्विंटल इतकी आवक झाली. या बाजार समितीत कमीत कमी प्रतिक्विंटलला 1000 रुपये तर सरासरी 9500 रुपये बाजार भाव मिळाला. द्राक्षास कमीत कमी पंधराशे तर सरासरी पाच हजार दोनशे रुपये बाजार भाव मिळाला. कलिंगडला कमीत कमी आठशे रुपये तर सरासरी 1100 रुपये भाव मिळाला. आज पुणे बाजार समितीत केळीस कमीत कमी आठशे रुपये तर सरासरी 1100 रुपये बाजार भाव मिळाला.

आज पुणे बाजार समितीत मोसंबीस कमीत कमी 1800 ते सरासरी चार हजार दोनशे रुपये बाजार भाव मिळाला. पपईस कमीत कमी पाचशे रुपये तर सरासरी हजार रुपये बाजार भाव मिळाला. संत्रीस कमीत कमी दोन हजार रुपये तर सरासरी चार हजार रुपये बाजार भाव मिळाला. स्ट्रॉबेरीस कमीत कमी सात हजार रुपये तर सरासरी 8500 रुपये बाजार भाव मिळाला. 

पिकांच्या व्यवस्थापनापासून ते योजनापर्यंत, कृषि विषयक सर्व अपडेट्ससाठी लोकमत Agro चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा… 

टॅग्स :शेतीमार्केट यार्डफळेपुणे