आजच्या बाजारभाव अहवालानुसार टोमॅटो आणि द्राक्ष पिकाची आवक कमी अधिक प्रमाणात होऊ लागली आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना अपेक्षित असलेले बाजारभाव मिळत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. आज निवडक बाजार समित्यांचा आढावा घेतला तर टोमॅटोची तीन हजार क्विंटल तर द्राक्षांची साडे तीन हजार क्विंटल आवक झाल्याचे पाहायला मिळाले.
टोमॅटोचे आजचे बाजारभाव
आज 07 फेब्रुवारी 2024 रोजी राज्य शासनाच्या स्मार्ट प्रकल्पाच्या अंतर्गत बाजार माहिती विश्लेषण व जोखीम कक्षाने दिलेला आजचा अहवालानुसार सोलापूर बाजार समितीत 142 क्विंटल टोमॅटोची आवक झाली. या ठिकाणी कमीत कमी 300 रुपये तर सरासरी 900 रुपये दर प्रति क्विंटलला मिळाला. कोल्हापूर बाजार समितीत 362 क्विंटल टोमॅटोची आवक झाली. या ठिकाणी कमीत कमी 1500 रुपये तर सरासरी 2300 रुपये दर प्रति क्विंटलला मिळाला. नागपूर बाजार समितीत 700 क्विंटल टोमॅटोची आवक झाली. या ठिकाणी कमीत कमी 1200 रुपये तर सरासरी 1600 रुपये दर प्रति क्विंटलला मिळाला. छत्रपती संभाजीनगर बाजार समितीत 99 क्विंटल टोमॅटोची आवक झाली. या ठिकाणी कमीत कमी 1400 रुपये तर सरासरी 1850 रुपये दर प्रति क्विंटलला मिळाला.
आजचे द्राक्ष बाजारभाव
आज 06 फेब्रुवारी 2024 च्या राज्य शासनाच्या स्मार्ट प्रकल्पाच्या अंतर्गत बाजार माहिती विश्लेषण व जोखीम कक्षाने दिलेला आजचा अहवालानुसार छत्रपती संभाजीनगर बाजार समितीत 73 क्विंटल द्राक्षांची आवकझाली. या बाजार समितीत कमीत कमी 2500 तर सरासरी 7500 रुपयांचा दर मिळाला. सोलापूरला 3205 क्विंटल द्राक्षांची आवक झाली. या ठिकाणी प्रतिकलो 40 रुपये तर सरासरी प्रती किलोला 100 रुपये दर मिळाला. नागपूर बाजार समितीत 60 क्विंटल द्राक्षांची आवक झाली. या बाजार समितीत कमीत कमी 4000 रुपये तर सरासरी 5500 रुपये दर मिळाला.