Join us

Onion Market : आवकेसह दरातही घसरण, आज कांद्याला कुठे काय भाव मिळाला? वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2024 6:24 PM

जसजसे कांद्याचे बाजारभाव घसरले, तसतशी कांद्याची आवक देखील कमी झाली आहे.

जसजसे कांद्याचे बाजारभाव घसरले, तसतशी कांद्याची आवक देखील कमी झाली आहे. आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत 1 लाख 80 हजार क्विंटलची आवक झाली. आज कांद्याला सरासरी 1100 रुपये ते 1500 रुपये दर मिळाला. दोन दिवसांत चारशे ते पाचशे रुपयांची घसरण झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. 

आजच्या 08 मे 2024 रोजीच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार सार्वधिक उन्हाळ कांद्याची आवक झाली. आज सर्वसाधारण कांद्याला सरासरी 1200 रुपये ते 1500 रुपये दर मिळाला. फलटण बाजारात आलेल्या हायब्रीड कांद्याला सरासरी 1300 रुपये दर मिळाला. तर कल्याण बाजारात हलवा कांद्याला सरासरी 2000 रुपये दर मिळाला. 

आज सोलापूर बाजारात लाल कांद्याची 33 हजार क्विंटलची आवक झाली तर सरासरी 1200 रुपये दर मिळाला. तर सर्व बाजार समित्यांचा विचार करता सरासरी 1100 रुपये ते 1400 रुपये दर मिळाला. एकट्या हिंगणा बाजारात सरासरी 2 हजार रुपयांचा दर मिळाला. लोकल कांद्याला सरासरी 1350 रुपये ते 1900 रुपये दर मिळाला. नागपूर बाजारात पांढऱ्या कांद्याला सरासरी 1400 रुपये दर मिळाला. 

उन्हाळ कांद्याचे दर 

तर उन्हाळ कांद्याला सरासरी 1300 रुपये ते 1580 रुपये दर मिळाला. बाजार समितीनुसार पाहिले तर लासलगाव बाजार समितीत सरासरी 1500 रुपये, लासलगाव - विंचूर बाजारात 1550 रुपये, मनमाड बाजार समितीत 1400 रुपये, पिंपळगाव बसवंत बाजारात 1450 रुपये तर उमराणे बाजार 1450 रुपये दर मिळाला. 

असे आहेत आजचे कांद्याचे दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

08/05/2024
अकलुज---क्विंटल43030020001300
कोल्हापूर---क्विंटल886770022001400
अकोला---क्विंटल66780015001200
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल27544501350900
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल470120017501500
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल18355150023001900
खेड-चाकण---क्विंटल3300130020001500
सातारा---क्विंटल34850020001250
कराडहालवाक्विंटल9950020002000
फलटणहायब्रीडक्विंटल84040020001300
सोलापूरलालक्विंटल3312910023001200
बारामतीलालक्विंटल86330020001400
अमरावती- फळ आणि भाजीपालालालक्विंटल45060020001300
धुळेलालक्विंटल15320014051100
जळगावलालक्विंटल24604001402940
नागपूरलालक्विंटल2480100015001375
साक्रीलालक्विंटल440080016301350
भुसावळलालक्विंटल42100016001400
हिंगणालालक्विंटल3170020002000
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल3900124014551350
वाईलोकलक्विंटल15100023001900
मंगळवेढालोकलक्विंटल10320019001400
कल्याणनं. १क्विंटल3170022001950
नागपूरपांढराक्विंटल2000110015001400
येवलाउन्हाळीक्विंटल1000030017821550
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल200025015011300
नाशिकउन्हाळीक्विंटल738555016511350
लासलगावउन्हाळीक्विंटल294650020001500
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल1050080020511550
सिन्नरउन्हाळीक्विंटल401840016751400
मनमाडउन्हाळीक्विंटल200020216401400
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल2993140021511450
देवळाउन्हाळीक्विंटल363020019451580
उमराणेउन्हाळीक्विंटल2150075118261450
टॅग्स :कांदामार्केट यार्डसोलापूरनाशिकशेती