नवरात्रोत्सवात नऊ दिवस देवीचा उत्सव साजरा केला जातो. या उत्सवात सध्या उपवासाचे प्रमाण वाढले असून, यामध्ये सर्वाधिक जास्त प्रमाणात साबुदाणा, शेंगदाणा, भगरीचा वापर केला जातो.
उपवासासाठी साबुदाण्याला पसंती असते. त्या पार्श्वभूमीवर भुसार बाजारात परराज्यातून साबुदाणा, शेंगदाणा, भगरीची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. यामध्ये उपवासासाठी लागणाऱ्या साबुदाण्याच्या दरात मात्र वाढ झाली आहे.
साबुदाण्याच्या दरात क्विंटलमध्ये ५०० रुपयांनी वाढ, तर ४ ते ५ रुपयांनी किलोमागे भाव वाढले आहेत, तर शेंगदाणा आणि भगरीचे दर मात्र स्थिर आहेत, अशी माहिती मार्केटयार्डमधील व्यापाऱ्यांनी दिली.
मार्केटयार्ड भुसार बाजारात तामिळनाडूतील सेलम जिल्ह्यातून साबुदाणा दाखल होत आहे. सध्या बाजारात दररोज ९० ते ११० टन साबुदाण्याची आवक होत आहे.
नवरात्रीच्या उपवासानिमित्त विकांकडून साबुदाणा, भगर, राजगिरा, शिंगाडा, कुडू, शेंगदाणा यांसह त्यापासून तयार होणाऱ्या पिठांना मोठी मागणी वाढली.
घाऊक बाजारातील प्रतिकिलोचे दरप्रकार | किलोचे भाव रुपयेसाबुदाणा १ | ५३साबुदाणा २ | ५१भगर १ | ११५भगर २ | ११०शेंगदाणा (स्पॅनिश) | १००सावा भगर | ११०-११८घुंगरू शेगदाणा | ९७-१०४हलका शेगदाणा | ९०
नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांकडून साबुदाणा आणि भगरीला मागणी सातत्याने वाढत आहे. यंदा मागील वर्षीच्या तुलनेत साबुदाणा दरात वाढ झाली असून, भगरचे दर तुलनेने स्थिर आहेत. मात्र, मागणी वाढल्यास यामध्ये किंचित वाढ होण्याची शक्यता आहे. - आशिष दुगड, दी पूना मर्चेंड चेंबर सदस्य व व्यापारी
शेंगदाण्याचे दर मागील वर्षीच्या तुलनेत घटले आहेत. दिवाळीत आवक वाढेल. सध्या गुजरात, राजस्थान आणि कर्नाटक येथून शेंगदाण्याची आवक होत आहे. दररोज १०० ते ११० टन आवक होत आहे. शेगदाण्याचे दर मात्र स्थिर आहेत. - गणेश चोरडिया, शेंगदाणा व्यापारी
अधिक वाचा: आता घरबसल्या मिळणार जुने दस्त; नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने सुरु केली 'ही' नवीन सुविधा