राजाराम लोंढेकोल्हापूर : 'ब्याडगी'सह सर्वच लाल मिरच्यांचे उत्पादन यंदा मुबलक झाल्याने दर घसरले आहेत.
मागील हंगामात १० टक्के मिरची शेतकऱ्यांकडे आहे, त्यात यंदाचे उत्पादन त्यामुळे सध्या बाजारात आवक मोठ्या प्रमाणात आहे.
परिणामी 'ब्याडगी' मिरची प्रतिकिलो १५० ते ३०० रुपयांपर्यंत राहिले आहेत. आगामी चार महिन्यांत दरात आणखी घसरण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
किरकोळ बाजारातील दर
मिरची | किमान | कमाल | दोन वर्षापूर्वीचा |
ब्याडगी | १५० | ३५० | ६५० |
गरुडा | १०० | २५० | ३५० |
गंदूर | १६० | २०० | २६० |
लवंगी | १८० | २०० | ३०० |
मसालाही घसरणारचटणीसाठी आवश्यक मसाला सध्या तेजीत असला तरी आगामी काळात त्याच्या दरातही घसरण होण्याची शक्यता आहे.
मसालेचे दर असे (प्रतिकिलो)
खोबरे | १८० ते २०० |
लसूण | १०० ते ३०० |
धने | १२० ते १४० |
तीळ | १६० ते १८० |
जिरे | ३६० ते ४०० |
आंध्र प्रदेश, तेलंगणात चांगला पाऊस झाल्याने गेल्या वर्षीपेक्षा मिरचीचे यंदा पीक अधिक आहे, त्यात मागील हंगामातील शिल्लक माल असल्याने दर कमी आहेत. - राजेंद्र जंगम, मिरची व्यापारी
अधिक वाचा: Alibag White Onion : अलिबाग पांढऱ्या कांद्याचा माळा लवकरच बाजारात येणार; यंदा कसा राहील दर?