Join us

Kolhapur Gul Bajar Bhav : कोल्हापूर बाजार समितीत मुहूर्ताच्या सौद्यात गुळाला कसा मिळाला दर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2024 11:08 IST

कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या गूळ मार्केटमध्ये दीपावली पाडव्याच्या मुहूर्तावर गुळाचे सौदे काढण्यात आले. यामध्ये गुळाला प्रतिक्विंटल ५६०१ रुपये दर मिळाला.

कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या गूळ मार्केटमध्ये दीपावली पाडव्याच्या मुहूर्तावर गुळाचे सौदे काढण्यात आले. यामध्ये गुळाला प्रतिक्विंटल ५६०१ रुपये दर मिळाला.

पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित व जिल्हा उपनिबंधक नीलकंठ करे यांच्या हस्ते सौदा काढण्यात आला. सागर येरूडकर यांच्या गुळाला हा भाव मिळाला.

अधिक वाचा: Gul Bajar Bhav : पाडव्याच्या मुहूर्तावर गूळ सौद्यांना सुरवात कसा मिळतोय दर वाचा सविस्तर

समितीचे सभापती अॅड. प्रकाश देसाई यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. जिल्हा उपनिबंधक नीलकंठ करे यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी ज्येष्ठ संचालक संभाजी पाटील, भारत पाटील, शंकर पाटील, सुयोग वाडकर, पांडुरंग काशीद, राजाराम चव्हाण, दिलीप पोवार, सचिव जयवंत पाटील यांच्यासह व्यापारी, अडते व शेतकरी उपस्थित होते.

टॅग्स :बाजारमार्केट यार्डशेतकरीकोल्हापूरपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीऊस