Join us

Kapus Bajar : दर मिळत नसेल तर कापसाची लागवड करावी की नाही? शेतकरी संतप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 16:16 IST

Cotton Market Update : शेतकऱ्यांचे नगदी पीक असलेल्या कापसाला योग्य भाव मिळत नसेल तर लागवड करायची की नाही, असा प्रश्न अकोला जिल्ह्यातील खारपाणपट्ट्यातील शेतकऱ्यांमधून उपस्थित होत आहे.

शेतकऱ्यांचे नगदी पीक असलेल्या कापसाला योग्य भाव मिळत नसेल तर लागवड करायची की नाही, असा प्रश्न अकोला जिल्ह्यातील खारपाणपट्ट्यातील शेतकऱ्यांमधून उपस्थित होत आहे.

गतवर्षी ८ हजार रुपये प्रतिक्विंटल भाव कापसाला मिळाला होता; परंतु यावर्षी ७ हजार प्रतिक्विंटलच दर मिळत आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक चिंतेत आहे.

गतवर्षी ८ हजार रुपये प्रतिक्विंटल कापसाला भाव मिळाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी भाव मिळेल, या आशेवर पावसाचे प्रमाण कमी राहिले तरी कापसाची लागवड केली; परंतु सुरुवातीपासून बाजारात कापसाचा दर कमी आहे. त्यात लागवडीचा खर्चही वाढला आहे. भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.

कापसामध्ये त्रुटी काढून त्यास भाव देतात. त्यामुळे शेतकऱ्यांना शेती करणे अवघड होऊन बसले आहे. शेतीमालाला योग्य भाव द्यावा, ही अपेक्षा आहे. - गणेश शेगोकार, शेतकरी.

खेडा खरेदी ७ हजारांचा मिळतोय भाव

• एकीकडे कापसाचा उतारा कमी आणि गतवर्षी शेतकऱ्यांच्या कापसाला ८००० हजार रुपये क्विंटल भाव मिळाला होता; परंतु यावर्षी खेडा खरेदीत कापसाला प्रतिक्विंटल ७ हजार रुपयेच भाव मिळत असल्याचे चित्र आहे.

• यावर्षीपेक्षा गतवर्षी बरा पाऊस झाला. त्यामुळे कापसाची लागवडही बऱ्यापैकी होती. एकरी ३ ते ४ क्विंटलच उतारा लागला त्यात भावही मिळत नसल्याने शेती करावी तरी कशी, असा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित होत आहे

कापसाला ८ हजार रुपये भाव मिळाला होता. परंतु, यावर्षी ७ हजारांच्या पुढे भाव जात नाही. महागाईच्या काळात शेतकऱ्यांनी करावे तरी काय, असा प्रश्न आहे. शेती करणे कठीण होऊन बसले आहे. - गोपाल वडतकार, शेतकरी.

राज्यातील सोमवार (दि.०६) जानेवारी रोजीचे कापूस दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
06/01/2025
अमरावती---क्विंटल90720075257362
सावनेर---क्विंटल4500705071257100
किनवट---क्विंटल53690070006950
उमरेडलोकलक्विंटल699700071407050
काटोललोकलक्विंटल254690072007050
बार्शी - टाकळीमध्यम स्टेपलक्विंटल9000742174217421
पुलगावमध्यम स्टेपलक्विंटल1850690073517150

(सौजन्य : कृषि पणन महामंडळ महाराष्ट्र राज्य.). 

हेही वाचा : Dairy Farmer Success Story : दत्तात्रयरावांची दुग्ध व्यवसायात प्रगती; ढासळलेल्या आर्थिक परिस्थितीला दिली जोरदार भरारी

टॅग्स :कापूसशेतकरीशेतीशेती क्षेत्रमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीविदर्भ