Join us

Kanda Market : सोलापूर बाजार समितीत कांदा आवक मंदावली; दरात काय सुधारणा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 11:22 IST

Kanda Bajar Bhav राज्यात एकीकडे अनेक बाजार समित्यांत हमालांच्या वाढीव वाराई बंद मुळे कांदा बाजारात पडझड सुरू आहे.

Solapur Kanda Market राज्यात एकीकडे अनेक बाजार समित्यांत हमालांच्या वाढीव वाराई बंद मुळे कांदाबाजारात पडझड सुरू आहे.

दुसरीकडे अंतिम टप्प्यातील साठवणुकीतील कांदा आता बाजारात येतोय. दरम्यान सोलापूर जिल्ह्यातील श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या दरात चढ-उतार पाहायला मिळत आहे.

मागील दोन-तीन दिवसांपूर्वी आवक वाढली होती. मात्र दरात घसरण होत होती. बुधवारी ११४ ट्रक आवक होती तर गुरुवारी केवळ ६६ ट्रक कांदा विक्रीला आला होता.

बुधवारच्या तुलनेत गुरुवारी दरामध्ये ५०० रुपयांनी वाढ झाली होती. प्रतिक्विंटल कमाल दर १७०० वरून आता २२०० रुपयापर्यंत पोहोचला आहे. सरासरी भाव १००० रुपये मिळत आहे.

अधिक वाचा: आता प्रत्येक शेताला मिळणार १२ फुटांचा शेतरस्ता; पाणंद रस्त्यांसाठी येणार 'ही' योजना

टॅग्स :कांदाबाजारमार्केट यार्डशेतीपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीसोलापूर