चाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांदा, बटाटा, गाजर आणि टोमॅटो यांची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे.
लसणाची आवक व त्याचा भाव स्थिर राहिला. चाकण येथील पालेभाज्यांच्या बाजारात पालक आणि मेथीची आवक वाढल्याने त्यांचे भाव कमी झाले. एकूण उलाढाल ६ कोटी ४० लाख रुपये झाली.
चाकण येथील बाजारात कांद्याची एकूण ७ हजार क्विंटल आवक झाली. कांद्याचा कमाल भाव २ हजार रुपयांवरून १,७०० रुपयांवर स्थिरावला, बटाट्याची एकूण आवक २,५०० क्विंटल झाली.
गेल्या शनिवारच्या तुलनेत बटाट्याची आवक ५०० क्विंटल ने वाढल्याने भावात २०० रुपयांची घट झाली. बटाट्याचा कमाल भाव १,३०० रुपयांवर स्थिरावला.
लसणाची एकूण आवक ५० क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक स्थिर राहून लसणाचा कमाल भावही १२ हजार रुपयांवर स्थिरावला.
हिरव्या मिरचीची एकूण आवक ३०० क्विंटल झाली; हिरव्या मिरचीला ६ हजार रुपयांपासून ते ८ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला.
शेतीमालाच्या आवकेचे व बाजारभावकांदाएकूण आवक - ७ हजार क्विंटल.भाव क्रमांक १) १,७०० रुपये.भाव क्रमांक २) १,२०० रुपये.भाव क्रमांक ३) ८०० रुपये.
बटाटाएकूण आवक - २,५०० क्विंटल.भाव क्रमांक १) १,३०० रुपये.भाव क्रमांक २) १,००० रुपये.भाव क्रमांक ३) ५०० रुपये.
अधिक वाचा: राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जाची होणार पुनर्रचना; नेमका कसा होणार फायदा? वाचा सविस्तर
Web Summary : Chakan market sees a surge in onion arrival, pushing prices down to ₹1,700/quintal. Potato prices also dipped due to increased supply. Garlic prices remained stable. Total turnover reached ₹6.4 crore.
Web Summary : चाकण मंडी में प्याज की आवक में उछाल आया, जिससे कीमतें गिरकर ₹1,700/क्विंटल हो गईं। आपूर्ति बढ़ने से आलू की कीमतों में भी गिरावट आई। लहसुन की कीमतें स्थिर रहीं। कुल कारोबार ₹6.4 करोड़ रहा।