Join us
Daily Top 2Weekly Top 5

Kanda Market : श्रीरामपूर बाजार समितीत मोकळा कांदा लिलावास चांगला प्रतिसाद; कसा मिळाला दर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 11:39 IST

kanda bajar bhav मोकळा कांदा लिलाव पद्धतीस शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. गोणीतील कांद्याचे लिलाव सोमवार, बुधवार, शुक्रवारी होतात.

श्रीरामपूर : येथील बाजार समितीत मोकळा कांदा लिलाव पद्धतीमध्ये १०७ वाहनांची गुरुवारी आवक झाली. उच्च प्रतीच्या कांद्यास सर्वाधिक १,५०० रुपये क्विंटल दर मिळाला.

मोकळा कांदा प्रथम श्रेणीचा १,२०० ते १,५००, द्वितीय श्रेणीचा कांदा १,००० ते १,२००, तृतीय श्रेणीचा ७०० ते १,०००, गोल्टी ९०० ते १,१५० व खाद कांदा ५०० ते ७०० रुपये प्रती क्विंटल लिलावात विक्री झाला.

कांद्याचे बाजारभाव स्थिर राहिले. मोकळा कांदा लिलाव पद्धतीस शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. गोणीतील कांद्याचे लिलाव सोमवार, बुधवार, शुक्रवारी होतात.

मोकळा कांदा बाजार सोमवार ते शुक्रवार हे पाच दिवस असतो. शेतकऱ्यांनी कांदा विक्रीस आणण्याचे आवाहन सभापती सुधीर नवले व सचिव साहेबराव वाबळे यांनी केले आहे.

अधिक वाचा: मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्याचा अंदाज जाहीर; कसा राहणार पाऊस? वाचा सविस्तर

टॅग्स :कांदाबाजारमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीश्रीरामपूरशेतकरीशेती