Join us

Kanda Market : दीप अमावास्येमुळे कांदा बाजारात बदल, वाचा 23 जुलैला काय भाव मिळाला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 16:25 IST

Kanda Market : आज २३ जुलै रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये साडेतीन वाजेपर्यंत ९५ हजार २४३ क्विंटल कांद्याचे आवक झाली.

Kanda Market : आज आणि उद्या दीप (गटारी) अमावस्यामुळे अनेक ठिकाणी मजूर सुटीवर आहेत. या शिवाय शेतकरी आवक कमी करत असल्याने बाजारभाव कमी आहेत. शुक्रवारी किंवा शनिवारी व्यवहार सुरळीत होऊन पुन्हा बाजारभाव 50, 100 रुपयांनी बदलतील. आजच्या बाजार भावाबद्दल काळजी करू नये. 

आज २३ जुलै रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये साडेतीन वाजेपर्यंत ९५ हजार २४३ क्विंटल कांद्याचे आवक झाली. यामध्ये लासलगाव बाजारात उन्हाळ कांद्याची १२ हजार ४०० क्विंटल आवक झाली. कमीत कमी ५०० रुपये तर सरासरी १४०० रुपये दर मिळाला. 

येवला बाजारात १०७५ रुपये, पिंपळगाव बसवंत बाजारात १३०० रुपये, मनमाड बाजारात १३५० रुपये, पारनेर बाजारात १३०० रुपये, भुसावळ बाजारात १२०० रुपये, तर देवळा बाजारात १२२५ रुपये दर मिळाला.  तर नागपूर बाजारात लाल कांद्याला कमीत कमी ७०० रुपये तर सरासरी १४५० रुपये,  तर पांढऱ्या कांद्याला सरासरी १३५० रुपये दर मिळाला. 

Kanda Market : ऑगस्ट महिन्यात कांद्याला काय दर मिळतील, परिस्थिती काय राहील? वाचा सविस्तर

लोकल कांद्याला पुणे बाजारात कमीत कमी ५०० ते सरासरी ११०० रुपये, अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केटमध्ये सरासरी १५०० रुपये, सांगली फळे भाजीपाला मार्केटमध्ये १५०० रुपये, अहिल्यानगर कर्जत बाजारात ९०० रुपये, मंगळवेढा बाजारात १४०० रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

23/07/2025
अकलुज---क्विंटल21820015001000
कोल्हापूर---क्विंटल310250019001000
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल15243701400885
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल500170021001900
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल946890017001300
खेड-चाकण---क्विंटल900100017001400
कराडहालवाक्विंटल9980017001700
नागपूरलालक्विंटल124070017001450
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल290100020001500
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल238150018001150
पुणेलोकलक्विंटल623550017001100
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल14120018001500
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल80080013051200
कर्जत (अहमहदनगर)लोकलक्विंटल312001400900
मंगळवेढालोकलक्विंटल4110017201400
कामठीलोकलक्विंटल12155016501600
नागपूरपांढराक्विंटल100060016001350
येवलाउन्हाळीक्विंटल800030014731075
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल50045012621150
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल1200042015111325
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल68720014001250
मनमाडउन्हाळीक्विंटल90040013511350
सटाणाउन्हाळीक्विंटल1207026515501230
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल1800040019161300
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल437070015501200
पारनेरउन्हाळीक्विंटल361020018001300
भुसावळउन्हाळीक्विंटल1120012001200
देवळाउन्हाळीक्विंटल725025014251225
टॅग्स :कांदामार्केट यार्डशेती क्षेत्रशेतीनाशिक