अहिल्यानगर : नेप्ती कृषी उत्पन्न बाजार समितीत शनिवारी झालेल्या कांदा लिलावात प्रथम प्रतीच्या कांद्याला १५०० ते १९०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला.
समितीत एकूण २६ हजार ९९६ कांदा गोण्यांची आवक झाली. गेल्या काही दिवसांपासून समितीत कांदा आवक वाढत आहे.
शनिवारी झालेल्या लिलावात कांद्याचे दरप्रथम प्रतीच्या कांद्याला १५०० ते १९००द्वितीय प्रतीच्या कांद्यास १००० ते १५००तृतीय प्रतीच्या कांद्यास ५०० ते १०००चतुर्थ प्रतीच्या कांद्यास २०० ते ५०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला.
यात उच्च प्रतीच्या ३१ गोण्यांना उच्चांकी २१०० रुपयांचा, तर १४६ गोण्यांना २००० रुपये भाव मिळाला.
अधिक वाचा: Pik Spardha : खरीप हंगाम २०२४ पीक स्पर्धेचा राज्यस्तरीय निकाल जाहीर; विजेते शेतकरी कोण?