Join us

Kanda Bajar Bhav : केडगाव बाजार समितीत कांद्याचे भाव वाढले नव्या कांद्याला कसा मिळतोय दर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2024 15:27 IST

दौंड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजारात कांद्याची आवक कमी झाल्याने बाजारभाव वाढले आहेत. दरम्यान, जुना कांदा प्रतिकिलो ६६ रुपये, तर नवीन कांद्याला प्रतिकिलो ४५ रुपये भाव मिळाला.

दौंड : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजारात कांद्याची आवक कमी झाल्याने बाजारभाव वाढले आहेत. दरम्यान, जुना कांदा प्रतिकिलो ६६ रुपये, तर नवीन कांद्याला प्रतिकिलो ४५ रुपये भाव मिळाला.

गेल्या आठवड्यात कांद्याचे भाव घसरले होते. मात्र, चालू आठवड्यात कांद्याला भाव मिळाले नाहीत. लिंबाच्या आवकेसह बाजारभाव स्थिर निघाले.

दौंड येथील मुख्य आवारात पालेभाज्यांची आवक कमी झाल्याने बाजारभाव तेजीत निघाले आहेत. दौंड, केडगाव, यवत, पाटस येथे भुसार मालाची आवक कमी झाली असून, बाजारभाव तेजीत निघाले.

दौंड येथे पालेभाज्यांची आवक कमी झाल्याने बाजारभाव तेजीत निघाले आहेत. कोबी, वांगी, काकडी, कारली, शिमला, फ्लॉवर, वांगी, घेवडा, आद्रक आदी भाज्यांचे भाव तेजीत असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती गणेश जगदाळे, उपसभापती शरद कोळपे, सचिव मोहन काटे यांनी दिली.

उपबाजार केडगाव बाजारभावगहू (एचएफक्यू) - २,७०० ते ३,३०१ज्वारी - २,२०० ते ३,८००बाजरी - २,२०० ते ३,५००हरभरा - ५,५०० ते ६,५००मका - १,९०० ते २,२५०उडीद - ५,५०० ते ७,५००मुग - ५,६०० ते ७,०००कांदा - ९,००० ते ६,६००लिंबू - ५१० ते १,२१०

टॅग्स :कांदाबाजारमार्केट यार्डशेतकरीपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती