Join us

Kanda Bajar Bhav : चाकण बाजार समितीत कांद्याच्या भावात ४०० रुपयांची वाढ? कसा मिळतोय दर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 12:19 IST

चाकण येथील बाजारात कांद्याची एकूण आवक २,५०० क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक १,५०० क्विंटलने वाढूनही कांद्याच्या भावात वाढ झाली

चाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटयार्ड मध्ये वाटाणा, कारली, हिरवी मिरची व रताळ्याचे भाव तेजीत राहिले.

चाकण बाजारात टोमॅटो, कोबी, फ्लॉवर आवक वाढली. पालेभाज्यांची आवक वाढल्याने भाव घसरले. भुईमूग शेंगा व जळगाव भुईमूग शेंगांची आवक झाली नाही. एकूण उलाढाल ५ कोटी १० लाख रुपये झाली.

चाकण येथील बाजारात कांद्याची एकूण आवक २,५०० क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक १,५०० क्विंटलने वाढूनही कांद्याच्या भावात ४०० रुपयांची वाढ झाली. कांद्याचा कमाल भाव १,४०० रुपयांवरून १,८०० रुपयांवर पोहचला.

बटाट्याची एकूण आवक १,७५० क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक ३५० क्विंटलने वाढूनही भावात २०० रुपयांची वाढ झाली. बटाट्याचा कमाल भाव २,२०० रुपयांवर गेला.

लसणाची एकूण आवक २० क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक ८ क्विंटलने घटूनही लसणाचा कमाल भाव १० हजार रुपयांवर स्थिरावला.

हिरव्या मिरचीची एकूण आवक ३७५ क्विंटल झाली. हिरव्या मिरचीला २ हजार ५०० रुपयांपासून ते ३ हजार ५०० रुपयांपर्यंत भाव मिळाला.

शेतीमाल आवक व बाजारभावकांदाएकूण आवक - २,५०० क्विंटल.भाव क्रमांक १) १, ८०० रुपये.भाव क्रमांक २) १, २०० रुपये.भाव क्रमांक ३) ८०० रुपये.

बटाटाएकूण आवक - १,७५० क्विंटल.भाव क्रमांक १) २, २०० रुपये.भाव क्रमांक २) १,८०० रुपये.भाव क्रमांक ३) १, २०० रुपये.

अधिक वाचा: तुरीचे सर्वाधिक उत्पादन देणारे टॉप तीन वाण कोणते? जाणून घ्या सविस्तर

टॅग्स :कांदाबाजारमार्केट यार्डचाकणपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीभाज्या