Join us

Kanda Bajar Bhav : चाकण बाजार समितीत कांद्याच्या दरात वाढ; कसा मिळाला दर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2025 17:01 IST

चाकण खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांद्याच्या आवकमध्ये मोठी घट झाली.

चाकण खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांद्याच्या आवकमध्ये मोठी घट झाली.

बटाट्याची आवक कमी झाल्याने भावात घसरण झाली. अवकाळी पावसामुळे शेतीमालाला फटका बसल्याने हिरवी मिरची, टोमॅटो, कोबी, भेंडी आवक कमी झाल्याने भावात वाढ झाली.

चाकण येथील बाजारात कांद्याची एकूण आवक ६०० क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक २,४०० क्विंटलने कमी होऊनही कांद्याच्या भावात १०० रुपयांची वाढ झाली. कांद्याचे कमाल भाव १,३०० रुपयांवरून १,४०० रुपयांवर पोहोचले.

बटाट्याची एकूण आवक १,४०० क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक १०० क्विंटलने कमी झाल्याने बटाट्याच्या भावात २,०० रुपयांची घसरण झाली.

बटाट्याचा भाव २,२०० रुपयांवरून २,००० रुपयांवर आला. लसणाची एकूण आवक २५ क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक वाढूनही लसणाचा कमाल भाव १० हजार रुपयांवर स्थिरावला.

आवक व बाजारभावकांदाएकूण आवक - ६०० क्विंटल.भाव क्रमांक १) १,४०० रुपये.भाव क्रमांक २) १,२०० रुपये.भाव क्रमांक ३) ८०० रुपये.बटाटाएकूण आवक - १,४०० क्विंटल.भाव क्रमांक १) २,००० रुपये.भाव क्रमांक २) १,५०० रुपये.भाव क्रमांक ३) १,३०० रुपये.

अधिक वाचा: सरकारजमा झालेल्या या पाच हजार एकर जमिनी शेतकऱ्यांच्या नावावर होणार; जाणून घ्या सविस्तर

टॅग्स :कांदाबाजारचाकणशेतकरीपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीबटाटामार्केट यार्ड