चाकण खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांद्याची आवक घटूनही भावात किंचित वाढ झाली.
बटाट्याची आवक आणि भाव स्थिर राहिले. हिरवी मिरची, टोमॅटो, कोबी, भेंडी आवक कमी झाल्याने भाव घसरले.
पालेभाज्यांची आवक कमी झाल्याने भावात किंचित वाढ झाली. जनावरांच्या संख्येत वाढ झाली. एकूण उलाढाल ५ कोटी ७० लाख रुपये झाली.
चाकण येथील बाजारात कांद्याची एकूण आवक ३,९०० क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक १०० क्विंटलने कमी होऊनही कांद्याच्या कमाल भावात ५० रुपयांची वाढ झाली. कांद्याचे भाव १,२५० रुपयांवरून १,३०० रुपयांवर पोहोचले.
बटाट्याची एकूण आवक १,५०० क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक स्थिर राहून बटाट्याचा कमाल भाव २,००० रुपयांवर स्थिरावला. लसणाची एकूण आवक २९ क्विंटल झाली.
शेतीमाल आवक व बाजारभावकांदाएकूण आवक - ३,९०० क्विंटल.भाव क्रमांक १ - १,३०० रुपये.भाव क्रमांक २ - १,१०० रुपये.भाव क्रमांक ३ - ७०० रुपये.
बटाटाएकूण आवक - १,५०० क्विंटल.भाव क्रमांक १ - २,००० रुपये.भाव क्रमांक २ - १,५०० रुपये.भाव क्रमांक ३ - १,३०० रुपये.
अधिक वाचा: कोणत्याही जमिनीचा पोटहिस्सा खरेदी करताय? आता राज्य शासनाचा हा नवा नियम; वाचा सविस्तर