Join us

Kanda Bajar Bhav : चाकण बाजार समितीत कांद्याची मोठी आवक: कसा मिळतोय दर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 11:36 IST

Kanda Market Update खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये हिरवी मिरची, टोमॅटो, कांदा व लसणाची प्रचंड आवक झाली.

चाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्याचाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये हिरवी मिरची, टोमॅटो, कांदा व लसणाची प्रचंड आवक झाली.

पालेभाज्यांची आवक घटूनही भावात घसरण झाली, तोतापुरी आंब्याची आवक सुरू झाली. भुईमूग शेंगांची काहीच आवक झाली नाही. एकूण उलाढाल १० कोटी रुपये झाली.

चाकण येथील बाजारात कांद्याची एकूण आवक २,५०० क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक २,००० क्विंटलने वाढल्याने कांद्याचा कमाल भाव १,४०० रुपयांवर स्थिरावला.

बटाट्याची एकूण आवक १,२५० क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक १५० क्विंटलने घटूनही भावात १०० रुपयांची वाढ झाली. बटाट्याचा कमाल भाव २,१०० रुपयांवर स्थिरावला.

लसणाची एकूण आवक ४५ क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक २० क्विंटलने वाढूनही लसणाचा कमाल भाव १० हजार रुपयांवर स्थिरावला.

हिरव्या मिरचीची एकूण आवक ३६० क्विंटल झाली. हिरव्या मिरचीला २ हजार रुपयांपासून ते ३ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला.

शेतीमालाची आवक व बाजारभावकांदाएकूण आवक - २,५०० क्विंटल.भाव क्रमांक १) १,४०० रुपये.भाव क्रमांक २) १,००० रुपये.भाव क्रमांक ३) ८०० रुपये.बटाटाएकूण आवक - १,२५० क्विंटल.भाव क्रमांक १) २,१०० रुपये.भाव क्रमांक २) १,७०० रुपये.भाव क्रमांक ३) १,२०० रुपये.

अधिक वाचा: मान्सून किती दिवस घेणार विश्रांती? पेरणी करावी का? जाणून घ्या सविस्तर

टॅग्स :कांदाबाजारमार्केट यार्डचाकणशेतकरीबटाटापुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमिरची