Join us
Daily Top 2Weekly Top 5

Kanda Bajar Bhav : पाथर्डी बाजार समितीमध्ये कांदा बाजारभावात वाढ; एक नंबर कांद्याला कसा मिळाला दर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 15:48 IST

तिसगाव उपबाजारात आठवड्यातील दर मंगळवार, शुक्रवार व रविवारी लिलाव सुरू असतात. बाजार समितीमध्ये लिलावासाठी चांगले कांदा व्यापारी येत आहेत.

तिसगाव : पाथर्डी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (दि. २८) झालेल्या लिलावात एक नंबर कांद्याला दोन हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला.

मागील तीन महिन्यातील जिल्ह्यातील हा सर्वाधिक उच्चांकी भाव मिळाला आहे. तालुक्यासह जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शेतमाल पाथर्डी व तिसगाव उपबाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणावा असे आवाहन सभापती सुभाष बर्डे यांनी केले.

बर्डे म्हणाले, पाथर्डी बाजार समिती आवारात आठवड्यातील प्रत्येक बुधवार व रविवार दोन दिवस कांदा लिलाव केले जातात.

तिसगाव उपबाजारात आठवड्यातील दर मंगळवार, शुक्रवार व रविवारी लिलाव सुरू असतात. बाजार समितीमध्ये लिलावासाठी चांगले कांदा व्यापारी येत आहेत. बाजार समितीच्या वतीने त्यांना चांगल्या सुविधा देण्यात येत आहेत.

गेल्या तीन महिन्यांपासून कांद्याचे दर १ हजार ते १ हजार ३०० रुपयांच्या आसपास होते. कांदा दर सतत कोसळत असताना मंगळवारी (दि. २७) तिसगाव उपबाजारात एक नंबर कांद्याला १६०० रुपये भाव मिळाला होता. तो जिल्ह्यात सर्वाधिक होता.

बुधवारी (दि. २८) पाथर्डी बाजार समितीमध्ये झालेल्या लिलावात २४६६ गोणी व १२३३ क्विंटल कांद्याची आवक झाली. एक नंबर कांद्याला दोन हजार रुपये, तर दोन नंबरला १ हजार ते १ हजार ५०० रुपये दर मिळाला आहे.

अधिक वाचा: तण नियंत्रण आच्छादन, फळ पिकांकरिता कव्हर व हायड्रोपोनिक्ससाठी मिळतंय अनुदान; वाचा सविस्तर

टॅग्स :कांदाबाजारमार्केट यार्डशेतकरीशेतीपाथर्डीपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती