Join us

Kanda Bajar Bhav : मंचर बाजार समितीत ५ हजार पिशव्यांची आवक; नंबर १ कांद्याला कसा मिळाला दर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 14:41 IST

Kanda Bajar Bhav एकूण ५ हजार ४७९ पिशवी कांद्याची आवक झाली. मागील काही दिवसांपूर्वी हाच बाजारभाव दहा किलोला दोनशे रुपयांपर्यंत गेला होता.

मंचर : उठाव नसल्यामुळे मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे बाजारभाव कमी झाले आहेत. मंगळवारी कांदा दहा किलोला १८० रुपये या भावाने विकला गेला, अशी माहिती सभापती नीलेश स्वामी थोरात यांनी दिली.

मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला उठाव कमी आहे. त्यामुळे कांद्याचे भाव पडले असून मंगळवारी चांगल्या प्रतीच्या कांद्याला दहा किलोला १८० रुपये असा बाजारभाव मिळाला.

एकूण ५ हजार ४७९ पिशवी कांद्याची आवक झाली. मागील काही दिवसांपूर्वी हाच बाजारभाव दहा किलोला दोनशे रुपयांपर्यंत गेला होता.

मात्र उठाव कमी असल्याने बाजारभाव कमी झाले आहे. बहुतेक शेतकऱ्यांनी कांदा बराखीत साठवून ठेवला आहे. चांगला बाजारभाव मिळण्याच्या प्रतीक्षेत शेतकरी आहेत.

कांद्याचे प्रति दहा किलोचे दर◼️ सुपर लॉट १ नंबर गोळा कांदा - १७० ते १८० रुपये.◼️ सुपर गोळे कांदा १ नंबर - १५५ ते १६५ रुपये.◼️ सुपर मिडियम कांदा २ नंबर - १३५ ते १५० रुपये.◼️ गोल्टी कांदा - ९५ ते १२५ रुपये.◼️ बदला कांदा व चिंगळी कांदा - ३० ते ८० रुपये.

अधिक वाचा: राज्यात शेतीमध्ये गुंतवणूक वाढवून पायाभूत सुविधा निर्मितीवर भर देणारी 'ही' योजना येणार

टॅग्स :कांदाबाजारमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीशेतीशेतकरीपीक