ओतूर : जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपबाजार आवार ओतूर येथे गुरुवारी बाजारच्या निमित्त कांद्याची १३,४८५ पिशव्यांची आवक झाली आहे.
अशी माहिती जुन्नर बाजार समितीचे सभापती संजय काळे, संचालक तुषार थोरात व ओतूर उपबाजारचे व्यवस्थापक सतीश मस्करे यांनी सांगितले.
ओतूर उपबाजारात कित्येक महिन्यापासून बाजार भावाची स्थिरता पाहायला मिळत आहे. गुरुवार दि. २४ जुलै २०२५ रोजी बाजारभाव वाढण्याची अपेक्षा होती. तीन महिन्यांपासून बाजारभावाने शेतकरी निराश होत आहे.
कांदा विकावा की ठेवावा हा प्रश्न सातत्याने शेतकऱ्याला पडत आहे. पुढील गुरुवारी तरी बाजार वाढतील या अपेक्षेने शेतकरीकांदा उपबाजारात आणत आहे.
१० किलो कांदा बाजारभावगोळा कांदा १६० ते २०१ रुपये.सुपर कांदा ११० ते १६० रुपये.गोल्टी कांदा नंबर ३० ते ११० रुपये.कांदा बदला २० रुपये बाजार भाव मिळाला.
अधिक वाचा: भारत, ब्रिटनमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करार; शेती क्षेत्राला कसा होणार फायदा?