आजऱ्याच्या शुक्रवारच्या आठवडा बाजारात विक्रीसाठी काजू बियांची चांगली आवक झाली. बाजारात काजू बियांना किलोला १६० रुपयांचा दर मिळाला. ५०० क्विंटल काजू बिया व्यापाऱ्यांकडून खरेदी करण्यात आल्या.
आजरा तालुक्यात काजू बियांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. चालू वर्षी सुरुवातीच्या टप्प्यात वातावरणातील बदल व धुके यामुळे काजूचे उत्पादन कमी होणार आहे.
तालुक्यात काजूवर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या दोन महिन्यापासून स्थानिक व परदेशातून येणाऱ्या काजू बियांचे दर वाढल्यामुळे अनेक प्रक्रिया उद्योग बंद आहेत.
१५ दिवसांपूर्वी पडलेल्या पावसामुळे काजूचा मोहोर गळून पडला. त्यानंतर पुन्हा काजूच्या झाडांना मोहोर आला आहे. एप्रिल महिन्यात काजू बिया खरेदी विक्रीचा व्यवसाय सुरू होतो.
आठवड्याच्या बाजारात जवळपास २५ काटे खरेदीसाठी लावले होते. अनेक व्यापारी गावोगावी जाऊन काजू बियांची खरेदी करीत आहेत.
काजूवर प्रक्रिया करणारे लहान मोठे १५० उद्योग आहेत. या उद्योगांना स्थानिक काजू बिया कमी झाल्यास परदेशातून काजू बियांची आवक केली जाते.
आजच्या बाजारात काजू बियांचा दर किलोला १६० रुपये झाल्याने पुढच्या शुक्रवारी आवक वाढण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी बाजारात १६० रुपयांचा दर काजू बियांना मिळाला. मे महिन्यात या दरामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
दर वाढल्याने अनेकांनी प्रक्रिया उद्योग केले बंदकाजू बियांचे दर वाढल्याने त्यांच्यावर प्रक्रिया करून विक्री करणे उद्योजकांना परवडत नाही. त्यामुळे अनेकांनी आपले प्रक्रिया उद्योगच बंद ठेवणे पसंद केले आहे.
अधिक वाचा: येत्या खरीप हंगामापासून सर्व प्रकारच्या बियाण्याची विक्री साथी पोर्टलवरून; वाचा सविस्तर