कोल्हापूर : गेल्या आठवड्यात रंगमिश्रित गुळावरून व्यापाऱ्यांनी गूळ खरेदी बंद केल्याने बाजार ठप्प झाला होता.
मात्र, सोमवारपासून गुळाचे सौदे पूर्ववत झाले. समितीमध्ये ८,०८५ रव्यांची तर १० हजार ५५८ बॉक्सची आवक झाली होती.
सरासरी प्रतिक्विंटल ४,४०० रुपये दर मिळाला. गुरुवार (दि. २३) पासून रंगविरहित गूळच खरेदी केला जाणार आहे.
गुजरातमधील व्यापाऱ्यांकडे रंगमिश्रित गूळ सापडल्याने तेथील अन्न-औषध प्रशासनाने कारवाई केली होती.
त्यामुळे शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला गूळ प्रयोगशाळेत तपासलेले प्रमाणपत्र असेल तरच खरेदी करू, असा पवित्रा व्यापाऱ्यांनी घेतल्याने गुळाचे सौदे ठप्प झाले होते.
सोमवारपासून गूळ सौदे सुरू करून गुरुवार (दि. २३) नंतर प्रयोगशाळेत तपासणी केलेला गूळच खरेदी केला जाणार आहे.
त्यानुसार, सोमवारी बाजार समितीत ८,०८५ रवे व १०,५५८ बॉक्सची आवक झाली होती. त्याचा सौदा काढण्यात आला.
यामध्ये रव्यांना प्रतिक्विंटल ४,१०० ते ४,७५० रुपये तर बॉक्समधील गुळाला प्रतिक्विंटल ३,७०० ते ४,७७५ रुपये दर मिळाला. गुरुवारपासून रंगविरहित गूळ खरेदी केला जाणार आहे.
एक दिवस आड सौदेगुळाची आवक कमी झाल्याने हमालांच्या मागणीनुसार एक दिवस आड सौदे काढले जाणार आहेत. त्यामुळे बुधवारी सौदा होणार आहे.
सोमवारी गुळाचे सौदे पूर्ववत सुरू झाले. आवक कमी असल्याने आता एक दिवस आड सौदे काढले जाणार आहेत. - तानाजी दळवी, सचिव, बाजार समिती
अधिक वाचा: वडिलोपार्जित शेतजमीन वाटणीचा खर्च आता वाचणार; वाचा महसूल विभागाचा 'हा' नवीन निर्णय?
Web Summary : Jaggery trade resumes in Kolhapur after color concerns halted sales. Average rate: ₹4,400/quintal. Colorless jaggery purchases begin Thursday after lab tests.
Web Summary : कोल्हापुर में रंग संबंधी चिंताओं के कारण बिक्री रुकने के बाद गुड़ का व्यापार फिर से शुरू हो गया। औसत दर: ₹4,400/क्विंटल। लैब परीक्षणों के बाद गुरुवार से रंगहीन गुड़ की खरीद शुरू।