Join us
Daily Top 2Weekly Top 5

गुळात सिंथेटिक रंग आढळल्याने गूळ सौदे बंद; प्रयोगशाळेत तपासणी करूनच आता खरेदी होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2026 17:48 IST

गुजरातमधील गूळ खरेदीदारांनी सोमवार, मंगळवारी गूळ खरेदी करणार नाही, असे कळविल्याने या शेतकऱ्यांनी दोन दिवस उत्पादन बंद केले आहे.

कोल्हापूर : कोल्हापूरबाजार समितीतून गुजरातला पाठवल्या जाणाऱ्या गुळाची प्रयोगशाळेत तपासणी करून त्यामध्ये भेसळ नसल्याच्या दाखल्यासह पाठवा तरच खरेदी करू.

असा पवित्रा अहमदाबाद (गुजरात) येथील खरेदीदार असोसिएशनने घेतल्याने कोल्हापुरातील व्यापाऱ्यांची कोंडी झाली आहे.

सिंथेटिक रंगाचा वापर केला तर गूळ खरेदी केला जाणार नसून, सोमवारपासून बाजार समितीमधील खरेदी बंद राहणार आहे.

गेल्या आठवड्यात गुजरातमधील एका व्यापाऱ्यावर गुळात सिंथेटिक रंग आढळल्याने तेथील प्रशासनाने गुन्हा दाखल केला होता.

त्यामुळे भीतीपोटी बहुतांशी इतर व्यापाऱ्यांनी गूळ खरेदी करण्यास नकार दिल्याने पेच निर्माण झाला आहे.

गुजरातमधील चार असोसिएशने रंगमिश्रित व प्रयोगशाळेचा तसा रिपोर्ट नसलेला गूळ खरेदी करणार नाही, असे शाहूपूरी मर्चेंट असोसिएशनला कळविले आहे.

या असोसिएशनने कळविले◼️ गूळ व्यापारी मंडळ, मार्केट वीसनगर उत्तर गुजरात.◼️ अहमदाबाद जगरी व शुगर असोसिएशन, अहमदाबाद.◼️ जुना माधवपुरा गूळ व्यापारी असोसिएशन, अहमदाबाद.◼️ म्हैसाणा गूळ असोसिएशन.

बिगर रंगाचा गूळ कोणी घेईनाबिगर रंगाचा गूळ काही शेतकऱ्यांनी तयार करून आणला होता. पण, असा गूळही कोणी खरेदी करेना, नियमित गुळापेक्षा किलोमागे पाच ते सहा रुपये कमी दराने गुळाची मागणी होऊ लागल्याने शेतकरी अडचणीत आला आहे

गूळ कर्नाटकाचा, शिक्षा कोल्हापूरच्या शेतकऱ्यांनागुजरातमध्ये सिंथेटिक रंग सापडलेला गूळ हा कर्नाटकातून खरेदी केलेला होता. मात्र, सरसकट कोल्हापुरातून येणारा गूळ घेण्यास तेथील व्यापाऱ्यांनी नकार दिला आहे.

गुजरातमधील गूळ खरेदीदारांनी सोमवार, मंगळवारी गूळ खरेदी करणार नाही, असे कळविल्याने या शेतकऱ्यांनी दोन दिवस उत्पादन बंद केले आहे. बुधवार (दि. १५) पासून गुळाचे सौदे सुरू होणार आहेत. - तानाजी दळवी, सचिव, बाजार समिती

अधिक वाचा: आरोग्यासाठी भारी ठरणाऱ्या ज्वारीचे दर आता गव्हापेक्षा वर; वाचा क्विंटलला काय मिळतोय दर?

English
हिंदी सारांश
Web Title : Synthetic Color Found in Jaggery; Trade Suspended, Lab Tests Mandatory

Web Summary : Jaggery trade halted in Kolhapur after synthetic color detection. Gujarat buyers demand lab-tested jaggery, impacting farmers. Karnataka jaggery blamed.
टॅग्स :शेतकरीशेतीऊसकोल्हापूरगुजरातपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीकर्नाटकबाजारमार्केट यार्ड