Join us

४ हजार १०० रुपये प्रतिक्विंटलने गुळाच्या सौद्यास प्रारंभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2023 13:17 IST

कऱ्हाड बाजार समितीत आडत दुकानामध्ये गुळाचे सौदे

कऱ्हाड शेती बाजार समितीच्या गूळ मार्केट यार्ड आवारामध्ये सोमवारी सभापती विजयकुमार सुभाष कदम यांच्या हस्ते गुळाच्या सौद्यास प्रारंभ झाला. गुळाच्या सौद्यामध्ये संजयकुमार आणि कंपनी, जे. बी. लावंड, आर. आर. पाटील या गूळ आडत दुकानामध्ये गुळाचे सौदे निघाले.

हंबीरराव गायकवाड,अधिकराव मोरे (देववाडी, सांगली) यांच्या गुळाला प्रतिक्विंटल ४१०० रुपये दर निघाला. गूळ सौद्यात प्रतिक्विंटल दर ३८०० ते ४१०० रुपये निघाले. गूळ उत्पादक शेतकऱ्यांचा सभापती कदम यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या सौद्यावेळी शेती उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयंतीलाल पटेल व जगन्नाथ लावंड तसेच गूळ व्यापारी देवेंद्र संगोई, तलकसी संगोई, केतन शहा, ओम हंबीरराव गायकवाड (पश्चिम गाला, शिवाप्पा खांडेकर, अशोक सपने).  संसही शिवाजी पवार उपस्थित होते.

टॅग्स :शेतकरीबाजारमार्केट यार्डसांगलीकराड