Join us
Daily Top 2Weekly Top 5

पोल्ट्री उद्योगात कोंबड्यांचे खाद्य म्हणून मक्याचा वापर वाढल्याने सोयाबीन दरावर परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2025 17:43 IST

Soybean & Maize Market Rate : सोयाबीन पेंड आणि मका या दोन्हींचा कोंबड्यांचे खाद्य म्हणून वापर केला जातो; परंतु असंख्य शेतकऱ्यांनी सलग अनेक वर्षे सोयाबीनच पिकवल्यामुळे त्यातील पौष्टिक मूल्य काहीसे कमी झाले आहे.

सोयाबीन पेंड आणि मका या दोन्हींचा कोंबड्यांचे खाद्य म्हणून वापर केला जातो; परंतु असंख्य शेतकऱ्यांनी सलग अनेक वर्षे सोयाबीनच पिकवल्यामुळे त्यातील पौष्टिक मूल्य काहीसे कमी झाले आहे.

परिणामी, कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून तुलनेने स्वस्त असलेल्या मक्याचा वापर वाढला असून सोयाबीनची मागणी घटल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्याचा थेट परिणाम यंदा सोयाबीनच्या दरावर झाल्याचे दिसून येत आहे.

मक्याचे दर सध्या सोयाबीनच्या तुलनेत कमी असून त्याचा पुरवठाही स्थिर आहे. विशेषतः नाशिक जिल्ह्यातील मका गुणवत्ता, उत्पादन आणि किमतीच्या बाबतीत सध्या राज्यभरात मागणीचा केंद्रबिंदू बनला आहे.

कोंबडीपालन उद्योगात सातत्याने वाढ होत असल्याने खाद्याची मागणीही मोठी आहे. त्यामुळे मका उत्पादकांसाठी हे चांगले दिवस असून, सोयाबीन उत्पादकांसाठी मात्र बाजारातील ही बदलती गरज चिंतेचा विषय बनली आहे.

वाशिमात सोयाबीनचे 66 उत्पादन ४५ लाख क्विंटलवर !

वाशिम जिल्ह्यात खरीप हंगामात लागवडीयोग्य ४ लाख हेक्टरपैकी तब्बल ३ लाख हेक्टरवर दरवर्षी सोयाबीनचा पेरा केला जातो. हेक्टरी १५ क्विंटलचे उत्पादन गृहीत धरल्यास एकट्या वाशिम जिल्ह्यात सोयाबीनचे तब्बल ४५ लाख क्विंटलवर उत्पादन होते.

कोंबड्यांचे खाद्य म्हणून पूर्वी

सोयाबीनला विशेष पसंती मिळायची. मात्र, गेल्या काही वर्षांत सोयाबीनमधील पोषण मूल्य घटले असून दराच्या बाबतीतही ते परवडेनासे झाले आहे. त्यामुळे पशुखाद्य निर्मिती करणाऱ्या कंपन्यांकडून मक्याचा सर्वाधिक वापर करून तयार केलेले खाद्य पुरविण्यात येत आहे. - अंकुश देशमुख, पोल्ट्री फार्म संचालक, करडा, ता. रिसोड जि. वाशिम.

हेही वाचा : जिद्दीला पेटला डी.एड धारक अन् तोट्याची शेती झाली फायद्याची; अमोदेच्या निवृत्तीरावांची वाचा 'ही' प्रेरणादायी कहाणी

टॅग्स :पोल्ट्रीशेती क्षेत्रसोयाबीनमकाशेतकरीबाजारमार्केट यार्ड