Join us

आठवडी बाजारात शेवगा, भेंडी, मिरची, लसणाचे भाव कडाडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2024 20:52 IST

पुढच्या महिन्यात भाजीपाला दर आणखी वाढण्याची शक्यता

बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात गतवर्षी कमी प्रमाणात पाऊस झाल्याने त्याचा परिणाम सध्या भाजीपाल्यावर होत आहे. आता भाज्यांचे दर कडाडले आहे. यात फक्त टोमॅटो स्वस्त, १० ते १५ रूपये किलोने मिळत आहेत. तसेच बाकी सर्व भाज्यांचे दर वाढल्याचे गेवराईच्या आठवडे बाजारात दिसून आले.

गेल्यावर्षी तालुक्यात सरासरीपेक्षा अत्यंत कमी पाऊस झाल्याने शेतातील पिके करपून गेली. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. कमी पावसामुळे आता एप्रिल महिन्यात आठवडे बाजारात भाज्यांचे भाव कडाडले आहे. मागणीच्या तुलनेत भाजीपाला उपलब्ध होत नसल्याने भाव तेजीत असल्याचे व्यापारी सांगतात. तसेच मे महिन्यात आणखी दर वाढण्याची शक्यता ते वर्तवितात. 

भाजीपाला दर (किलो)

लसूण - १२० रूपये

अद्रक - १२० रूपये

मिरची - १२० रूपये

शेवगा - १२० रूपये

कारले - ८० रूपये

बटाटे - ३० रूपये

भेंडी - ८० किलो

दोडके - १०० रूपये

पत्ताकोबी ८० किलो

फुलकोबी - ८० किलो

मेथी - १० जुडी

कोथिबीर - १० जुडी

लिंबू- १० रुपयाला दोन

टॅग्स :भाज्याशेतीशेतकरीदुष्काळबाजार