lokmat Supervote 2024
Lokmat Agro >बाजारहाट > खाद्य तेलाची आयात डिसेंबरमध्ये १६ टक्क्यांनी घसरली

खाद्य तेलाची आयात डिसेंबरमध्ये १६ टक्क्यांनी घसरली

Imports of edible oil decreased by 16 percent in December 23 in India | खाद्य तेलाची आयात डिसेंबरमध्ये १६ टक्क्यांनी घसरली

खाद्य तेलाची आयात डिसेंबरमध्ये १६ टक्क्यांनी घसरली

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये खाद्यतेलाची आयात घटून 13 लाख07 हजार 686 टन झाली आहे, जी मागील वर्षी याच कालावधीत 15 लाख 55 हजार,780 टन होती.

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये खाद्यतेलाची आयात घटून 13 लाख07 हजार 686 टन झाली आहे, जी मागील वर्षी याच कालावधीत 15 लाख 55 हजार,780 टन होती.

शेअर :

Join us
Join usNext

ir="ltr"> भारताची खाद्यतेल आयात डिसेंबरमध्ये १६ टक्क्यांनी घटून १३.०७ लाख टन इतकी झाल्याची माहिती तेल उत्पादकांची औद्योगिक संघटना सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया (SEA) ने जाहीर केली. त्यांनी जाहीर केल्यानुसार आकडेवारीनुसार, गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये खाद्यतेलाची आयात घटून 13 लाख07 हजार 686 टन झाली आहे, जी मागील वर्षी याच कालावधीत 15 लाख 55 हजार,780 टन होती.

कच्च्या पाम तेलाची आयात 8 लाख,43 हजार,849 टनांवरून 6 लाख,20 हजार,020 टनांवर घसरली, तर वनस्पतीजन्य पामोलिनची आवक 2,56,398 टनांवरून 2,51,667 टनांवर कमी झाली. तथापि, कच्च्या सूर्यफूल तेलाची आयात 1 लाख 94,009 टनांवरून वाढून 2 लाख 60,850 टन झाली आहे.

अखाद्य तेलाची आयात डिसेंबर 2022 मध्ये 10,349 टनांवरून गेल्या महिन्यात 4,000 टनांवर घसरली.सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया (SEA)ने सांगितले की, डिसेंबर 2023 मध्ये वनस्पती तेलांची (खाद्य तेले आणि अखाद्य तेले) आयात 16 टक्क्यांनी घसरून 13,11,686 टन झाली आहे. जी एका वर्षापूर्वी 15,66,129 टन होती. तेल विपणन वर्ष 2023-24 च्या पहिल्या दोन महिन्यांत वनस्पती तेलाची एकूण आयात 21 टक्क्यांनी घसरून 24,72,276 टन झाली आहे, जी मागील वर्षी याच कालावधीत 31,11,669 टन होती.

तेल विपणन वर्ष नोव्हेंबर ते ऑक्टोबर असे असते.  या कालावधीत खाद्यतेलाची आयात 30,84,540 टनांवरून 24,55,778 टनांवर घसरली, तर अखाद्य तेलांची आयात 27,129 टनांवरून घटून 16,498 टन झाली. नोव्हेंबर-डिसेंबर 2023 दरम्यान, खाद्यतेलाच्या आयातीमध्ये रिफाइंड पामोलिनचा वाटा 15 टक्क्यांवरून 17 टक्क्यांवर आला आहे, तर क्रूड पाम तेलाचा वाटा 85 टक्क्यांवरून 83 टक्क्यांवर आला आहे.

Web Title: Imports of edible oil decreased by 16 percent in December 23 in India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :SoybeanMarketFarmerसोयाबीनबाजारशेतकरी