Join us

अमेरिकेला आवडणाऱ्या कोल्हापुरी गुळाच्या निर्यातीवर टॅरिफमुळे कसा होणार परिणाम?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 14:33 IST

Kolhapur Jaggery कोल्हापूरच्या गुळाचा गोडवा जगभर प्रसिद्ध आहे. त्यामुळे येथील गुळाला जगभरातील अनेक देशांची मागणी आहे.

Kolhapur Jaggery Market कोल्हापूरच्या गुळाचा गोडवा जगभर प्रसिद्ध आहे. त्यामुळे येथील गुळाला जगभरातील अनेक देशांची मागणी आहे.

कोल्हापूरच्या गुळाला सर्वाधिक मागणी असणाऱ्या अमेरिकेने आयात शुल्क (टॅरिफ) लागू केल्याने अमेरिकेत कोल्हापूरच्या गुळाचा गोडवा काहीसा कमी होण्याची भीती निर्माण झाली आहे.

जगभरातील अनेक देशांमध्ये कोल्हापुरातून प्रत्येक वर्षी दीड लाख किलो गूळ निर्यात केला जातो. यापैकी एकट्या अमेरिकत ५०० क्विंटलपेक्षा अधिक गूळ निर्यात होतो.

येथे गुळाला पूर्वीपासून शंभर टक्के आयात शुल्क आकारले जाते मात्र, ट्रम्प सरकारने यावरही अतिरिक्त २५ टक्के आयात शुल्क आकारण्याचा निर्णय घेतल्याने अमेरिकेत कोल्हापुरी गूळ महाग होणार आहे.

आयात शुल्कामुळे महाग झालेल्या कोल्हापुरी गुळाची मागणी घटण्याची भीती कोल्हापुरातील गूळ व्यापाऱ्यांना आहे. आयात शुल्क रद्द करावा, अशी मागणी होत आहे.

कोल्हापूरसाठी अमेरिका का आहे महत्त्वाची?प्रत्येक वर्षी गूळ हंगामात दीड लाख किलोपेक्षा जास्त गूळ परदेशात निर्यात केला जातो. यापैकी एकट्या अमेरिकेत ५०० क्विंटलपेक्षा जास्त तो निर्यात केला जातो. गेल्या काही वर्षांपासून ही मागणी वाढत आहे. त्यामुळे अमेरिका गुळासाठी महत्त्वाची आहे.

कोल्हापुरातून ५० हजार किलोपेक्षा जास्त गूळ अमेरिकेत निर्यात केला जातो. तेथे यापूर्वी गुळावर शंभर टक्के आयात शुल्क होते. पण, आता त्यावरही २५ टक्के अतिरिक्त आयात शुल्क लावल्याने गूळ महाग होऊन मागणी घटण्याची शक्यता आहे. अतिरिक्त शुल्क रद्द करावे. - निमिष वेद, गूळ व्यापारी

अधिक वाचा: अखेर तिसऱ्या नोटिसीनंतर राज्यातील 'या' साखर कारखान्यांची मशिनरी केली सील

टॅग्स :शेतकरीशेतीअमेरिकाऊसकोल्हापूरबाजारमार्केट यार्ड