Join us

Mango Market लोणचाच्या गावरान आंब्याला शेकडा कसा मिळतोय दर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2024 2:18 PM

गावरान आंबा लोणची तयार करण्यासाठी उपयुक्त म्हटला जातो. कारण लोणची मुरल्यावर फोड व साल एकजीव असते. साल वेगळी पडत नाही. म्हणून गृहिनींचीही गावरान आंब्यालाच सर्वाधिक पसंती आहे. म्हणून सध्या गावरान आंबा शेकडा ४०० ते ५०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे.

मिरज पूर्व भागात आजही गावरान आंब्याची संख्या मोठी आहे. गावरान आंबा लोणची तयार करण्यासाठी उपयुक्त म्हटला जातो. कारण लोणची मुरल्यावर फोड व साल एकजीव असते. साल वेगळी पडत नाही.

म्हणून गृहिनींचीही गावरान आंब्यालाच सर्वाधिक पसंती आहे. म्हणून सध्या गावरान आंबा शेकडा ४०० ते ५०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. ग्रामीण भागामध्ये प्रामुख्याने लोणची तयार करण्याची हौस सर्वत्र दिसून येते.

बाजारात कैरी मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्याचे चित्र आहे. लोणची तयार करण्यासाठी हा गावरान आंबाच उपयुक्त म्हटल्या जातो. कारण लोणची मुरल्यावर फोड व साल एकजीव असते. साल वेगळी पडत नाही.

म्हणून लोणची करण्यासाठी गावरान आंब्याला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मिरज पूर्व भागामध्ये गावरान आंबा मोठ्या प्रमाणात आहे. गावरान आंब्यांचे लोणचे अतिशय रुचकर लागत असल्याने या आंब्यांना अधिक मागणी आहे.

यावर्षी हा आंबा विक्रीसाठी नुकताच दाखलही झाला होता. मात्र, अवघ्या आठवडाभरात वळीव पावसाने शेतकऱ्यांचे मनसुबे बदलले आहेत. सध्या या गावरान आंब्याला शेकडा ४०० ते ५०० रुपये दर मिळू लागला होता.

म्हणजे चार ते पाच रुपयांना एक आंबा मिळत होता. आता वळीव पावसातील वाऱ्याने आंब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

अधिक वाचा: Mango Ripening नैसर्गिकरीत्या पिकलेले आंबे कसे ओळखायाचे?

टॅग्स :आंबामिरजशेतकरीफळेमार्केट यार्डशेती