Harbhara Market : कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील काही दिवसांपासून हरभऱ्याची आवक होत आहे. सध्या बाजारात समाधानकारक दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी आपल्या माल विक्री करण्यासाठी बाजारात आणला आहे. (Harbhara Market)
मागील काही दिवसांपासून खामगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत २ किंवा ३ हजार क्विंटलपर्यंत हरभऱ्याची आवक सुरू होती; मात्र दरांमध्ये वाढ होताच आवकही वाढली आहे. (Harbhara Market)
बाजार समितीत गुरुवारी (१० एप्रिल) रोजी ८ हजार ८२५ क्विंटल हरभऱ्याची आवक झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांचा विक्रीकडे ओढा वाढल्याचे दिसून आले. पुढील काही दिवसांत दर ५ हजार पार करतील, अशी आशा शेतकऱ्यांना आहे. (Harbhara Market)
शेतकऱ्यांना दरवाढीचा फायदा
* ५ हजारांच्या पुढे जाणार असल्याचे संकेत आहेत.
* मार्चच्या शेवटी हरभऱ्याचे कमाल दर ५ हजार ५०० रुपये क्विंटलपर्यंत होते. गेल्या आठवड्यात बाजारात हरभऱ्याचे दर क्विंटलमागे ५,८०० ते ५,९०० रुपयांपर्यंत पोहोचले असून, काही दर्जेदार मालाला त्याहून अधिक दर मिळाल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली.
आकडेवारी काय म्हणते ?
मागील दररोजची सरासरी आवक - २,०००-३,००० क्विंटल
गुरुवारची आवक- ८,८२५ क्विंटल
आगामी दिवसांत दर स्थिर राहणार का ?
* विशेष म्हणजे, राज्यातील इतर बाजारपेठांतही हरभऱ्याच्या दरात चढ-उतार सुरूच आहेत. सोलापूर, अकोला, अमरावती या बाजारांतही दर काहीसे वाढले आहेत.
* दर वाढत असल्याने हरभरा उत्पादक शेतकऱ्यांनी घरातील माल विक्रीसाठी काढला आहे, परिणामी आवक वाढली असल्याचे दिसून येते.